Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात शेकडो किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे जाळे तयार करण्यात आले आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात राज्यातील रस्त्यांचे नेटवर्क अधिक मजबूत झाल्याचे आपल्याला दिसते. राज्याला समृद्धी महामार्गासारख्या हायटेक महामार्गाची भेट मिळाली आहे आणि नजीकच्या भविष्यात असेच काही आणखी नवीन महामार्ग तयार करण्यात येणार आहेत.

गेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळ राज्यात 4217 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करणार आहे आणि याच प्रकल्प अंतर्गत राज्याला आता 442 किलोमीटर लांबीचा नवीन एक्सप्रेस वे मिळणार आहे.
हा महामार्ग प्रकल्प लातूर आणि कल्याण या दोन महत्त्वाच्या महानगरांना जोडणारा असेल. लातूर कल्याण एक्सप्रेस वे 442 किलोमीटर लांबीचा राहणार असून या प्रकल्पामुळे 11 तासांचा प्रवास चार तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
आम्ही आपणास सांगू सध्या लातूर ते ठाणे, कल्याण हा प्रवास फारच आव्हानात्मक आहे. ठाणे कल्याणहुन लातूर कडे प्रवास करायचा असल्यास नागरिकांना जवळपास 10 – 11 तासांचा वेळ खर्च करावा लागतो, यामुळे हा प्रवासाचा कालावधी कमी व्हावा यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने लातूर कल्याण एक्सप्रेस वे प्रस्तावित केला आहे.
खरे तर या महामार्गाची चर्चा केल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे मात्र आतापर्यंत हा प्रकल्प कागदावरच होता. दरम्यान आठ डिसेंबर पासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या गडबडीतच या प्रकल्पाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा केला आहे. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला आणि यामध्ये लातूर कल्याण एक्सप्रेस वे चा देखील आढावा घेण्यात आला.
यावेळी त्यांनी या महामार्ग प्रकल्पाला तत्वतः मंजुरी प्रदान केली आहे. यानुसार आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे याला मंजुरी मिळाली की मग या प्रकल्पाचा डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होणार आहे.
दरम्यान आता आपण हा महामार्ग नेमका कसा राहणार, याचा रूट कसा राहणार, या महामार्ग प्रकल्पाची पुढील प्रक्रिया कशी असेल याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुढील 18 महिन्यांमध्ये कामाला सुरुवात होणार
लातूर – कल्याण महामार्ग हा सध्यातरी पाळण्यातच आहे. मात्र कागदावर असणारा हा प्रकल्प आता लवकरच सत्यात उतरणार असून याचा अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली असून आता राज्य मंत्रिमंडळाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर होणार आहे.
या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्याच्या कामाला पण सुरुवात करण्यात येईल. दरम्यान प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार झाला की मग तो पुन्हा एकदा सरकारकडे मंजुरीसाठी सादर होईल.
आराखड्याला मंजुरी मिळाली की मग निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. थोडक्यात आजपासून पुढील एक दीड वर्षात म्हणजेच येत्या 18 महिन्यांनी या महामार्ग प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महामार्गाचा रूट कसा राहणार
हा महामार्ग ठाणे, कल्याण मधील नागरिकांना जलद गतीने लातूरला पोहचवणार आहे. 11 तासांचा प्रवास या महामार्ग प्रकल्पामुळे फक्त चार तासात पूर्ण होईल असा दावा केला जातोय. या रस्त्याची सुरुवात कल्याण मधून होणार आहे आणि माळशेज घाटातून हा मार्ग अहिल्यानगरला जाणार आहे.
अहिल्यानगरमधून बीड-मांजरसुबा-आंबेजोगाई आणि पुढे लातूरला हा मार्ग जाईल. लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळ या महामार्गाचा एंडिंग पॉईंट राहू शकतो. या प्रकल्पासाठी जवळपास 35 हजार कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे.













