Gold Rate Prediction : 2025 हे वर्ष सोन्यासाठी विशेष खास ठरले आहे. सोन्याची किंमत 60 – 70 हजार रुपये प्रति तोळा यादरम्यान असताना ज्या लोकांनी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले त्यांना या मौल्यवान धातू ने अक्षरशः मालामाल केल आहे.
खरंतर गेल्या एका वर्षभरात सोन्याची किंमत प्रचंड वाढली आहे. 2025 मध्ये पहिल्यांदाच सोनं एक लाखाच्या पार पोहोचलं आणि आता बरेच महिने झालेत हा भाव मेंटेन आहे. सध्या स्थितीला सोन्याची किंमत एक लाख तीस हजार रुपये प्रति तोळा या दरम्यान आहे.

अशा स्थितीत अनेकांच्या माध्यमातून 2026 मध्ये या मौल्यवान धातूचे रेट कसे राहतील असा सवाल उपस्थित केला जातोय आणि आज आपण 2026 मध्ये 10 ग्राम सोने खरेदीसाठी साधारणता किती पैसे मोजावे लागणार? याची माहिती या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
2026 मध्ये सोन्याचे रेट कसे राहतील?
2025 मध्ये सोने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत राहिले कारण म्हणजे त्याच्या किमती. सोन्याच्या किमती सातत्याने वाढत राहिल्यात. यावर्षी गुंतवणूकदारांना शेअर मार्केट पेक्षा सोन्यातून अधिक रिटर्न मिळाले आहेत आणि यामुळे अनेकांचा कल या मौल्यवान धातूच्या गुंतवणुकीकडे आहे.
अनेकजण सोन्याच्या किमती 2026 मध्ये कशा राहतील असे प्रश्न उपस्थित करत आहेत. अशातच, आता कोटक सेक्युरिटीचा एक नवा अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये 2026 मध्ये सोन्याचे मार्केट कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील जोरदार तेजीमुळे सोन्याचे दर येत्या काळात पण असेच वाढत राहतील असा अंदाज आहे. 2026 मध्ये सोन्याची किंमत आणखी नवा उच्चांक गाठण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
तज्ञांकडून समोर आलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याची किंमत 5000 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय बाजारात एक तोळा सोने खरेदीसाठी ग्राहकांना दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो.
सोन्याच्या किमतीत तेजीत राहण्याचे अनेक कारणे आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे फेडरल रिझर्व व्याजदरात कपात सुरू ठेवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील श्रम बाजाराची कमकुवत स्थिती आणि आर्थिक वाढ मंदावल्यामुळे फेडरल रिझर्व्ह असा निर्णय घेईल आणि याचाच परिणाम म्हणून सोन्याचे रेट तेजीत राहण्याची शक्यता आहे.
कमी व्याजदरांचा फायदा नॉन-यील्डिंग मालमत्तांना मिळतो अन सोन्याची मागणी वाढते. सध्या अशीच परिस्थिती आहे आणि 2026 मध्ये पण ही परिस्थिती कायम राहू शकते.
दुसरीकडे काही तज्ञांनी जगभरातील सेंट्रल बँका आपल्या परकीय चलन राखीव मध्ये सोन्याचा साठा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत असल्याने सोन्याची किंमत वाढत असल्याचे सांगितले आहे.
अमेरिकन डॉलर कमजोर होण्याचा धोका वाढत असल्याने सेंट्रल बँकांकडून सोने खरेदी सुरू असल्याचेही तज्ञांनी स्पष्ट केले आहे. फक्त विकसितच नाही उदयोन्मुख अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांच्या सेंट्रल बँका सुद्धा हाच निर्णय घेत आहेत.
त्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे आणि रेट पण वाढू लागले आहेत. याशिवाय आणखी काही कारण आहेत जसे की जगभरात सुरू असणारा भू-राजकीय तणाव, युद्धस्थिती आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता.
दरम्यान, गेल्या एका सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 60 टक्क्याहून अधिक रिटर्न मिळाले. आता 2025 नंतर सोन्याच्या किमतीत थोडीशी स्थिरता येण्याची शक्यता आहे पण तरीही 2026 मध्ये सोन्याचा दीर्घकालीन तेजीचा ट्रेंड कायम राहील असा अंदाज समोर येत आहे.













