DA Hike News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. हे अपडेट आहे महागाई भत्ता वाढीबाबत. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो.
पहिल्यांदा जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढ लागू केली जाते. दरम्यान सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या टाइम्स ऑफ रेफरन्स ला गेल्या महिन्यात मान्यता सुद्धा मिळाली आहे.
नव्या आयोगाच्या समितीकडून आयोगाचे कामकाज सुद्धा सुरू करण्यात आले आहे आणि लवकरच याचा अहवाल सरकार दरबारी जमा होईल. अहवाल जमा होण्यासाठी जवळपास दीड वर्षांचा काळ आहे.
म्हणजेच प्रत्यक्षात आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्यास आणखी काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान आठवावेतन आयोग लागू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत राहणार आहे.
स्वतः केंद्रातील सरकारकडून याबाबत लोकसभेत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पुढील महागाई भत्ता वाढीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
2026 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्या सहा माहिती महागाई भत्ता वाढीबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जानेवारी 2026 मधील महागाई भत्ता वाढीबाबत मोठी अपेक्षा होती. पण, एलआयसीपीआयच्या सध्याच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळतोय यामध्ये दोन टक्क्यांची वाढ म्हणजेच जानेवारी महिन्यापासून 60 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. पण मागील सात वर्षांमध्ये ही सर्वात कमी महागाई भत्ता वाढ आहे.
यामुळे सरकारी नोकरदार वर्गात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत एआयसीपीआयची जुलै ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील आकडेवारी समोर आली आहे. येत्या काळात आकडेवारीत जर फारसा बदल झाला नाही तर यावेळी फक्त दोन टक्के महागाई भत्ता वाढू शकतो.
महागाई भत्ता वाढीचा जीआर कधी निघणार
महागाई भत्ता वाढ जानेवारी 2026 पासून लागू होईल. मात्र याचा जीआर हा मार्च 2026 मध्ये निघणार आहे. होळी सणाच्या आसपास महागाई भत्ता वाढीचा जीआर निघणार आहे.
अर्थात मार्च महिन्याच्या पगारासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे. यावेळी महागाई भत्ता फरकाची पण रक्कम दिली जाणार आहे, कारण की ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू असेल.













