राज्यातील शिक्षकांसाठी महायुती सरकार मोठा निर्णय घेणार ! बदल्यांसाठीच्या GR बाबत ‘हा’ निर्णय घेतला जाणार?

Published on -

Maharashtra Teacher : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांसाठी अधिक महत्त्वाचे आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्यातील शिक्षकांचे विविध मुद्दे सध्या चर्चेत आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विविध मुद्द्यांसाठी सातत्याने शिक्षक संघटना पाठपुरावा करतात. यात शिक्षकांची रिक्त पदे, त्यांच्या बदल्या, पुरेशी पटसंख्या नसल्याने बंद पडणाऱ्या शाळा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन असे मुद्दे नेहमीच चर्चेत राहतात.

शिक्षक संघटनांच्या माध्यमातून काही मुद्द्यांवरून आंदोलन सुद्धा केली जात आहेत. दरम्यान 8 डिसेंबर पासून उपराजधानी नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या हिवाळी अधिवेशनातून या मुद्द्यांबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

शिक्षकांशी निगडित काही मुद्द्यांवर आज विधिमंडळात सखोल चर्चा झाली. यावर महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

भाजप आमदारांनी उपस्थित केला महत्वाचा मुद्दा

भाजप आमदार मोहन मते यांनी झेडपी शाळांमधील शिक्षकांशी निगडित अनेक मुद्दे मांडलेत. शिक्षकांची बिंदूनामावली, बदल्या, समयोजन आणि बंद पडणाऱ्या शाळांबाबतचा मुद्दा त्यांनी सभागृहापुढे मांडला.

त्यावर गोरे यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. गोरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत सुमारे 66 हजार शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून पटसंख्या कमी झालेली एकही शाळा बंद पडणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

ते म्हणालेत की, बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान या प्रक्रियेमुळे येत्या शैक्षणिक वर्षात जून महिन्याच्या आधीचं बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

दरम्यान शिक्षकांच्या बदल्यांबाबत सातत्याने शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जातो आणि अशावेळी जीआर निघतो, शुद्धिपत्रक काढले जाते.

मात्र यामुळे आता शिक्षक बदल्यांबाबत जीआर ची संख्या फारच मोठी झाली आहे. यामुळे आता जुने सर्व जीआर रद्द करण्याची वेळ आली असून नव्याने शिक्षक बदली धोरण तयार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News