प्रतिक्षा संपली ! ‘या’ मुहूर्ताच्या आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पुढचा हफ्ता, वाचा सविस्तर

Published on -

Ladaki Bahin Yojana : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बाबत मोठी बातमी समोर आली आहे. या अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने राज्यभरात नाराजीचे वातावरण आहे.

खरेतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांना दरमहा मिळणाऱ्या मदतीमुळे मोठा आर्थिक आधार मिळतोय. मात्र, याचा नोव्हेंबरचा हप्ता रखडल्याने महिलांना डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचीही प्रतीक्षा करावी लागत आहे.

दरम्यान, आता नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे म्हणजेच ३ हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील काही नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका २० डिसेंबर रोजी होणार असून २१ डिसेंबरला मतमोजणी आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी किंवा २१ डिसेंबरपूर्वी रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत शासनाकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ही योजना राज्यातील गरीब, गरजू व मध्यमवर्गीय महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

घरखर्च, आरोग्य, शिक्षण तसेच दैनंदिन गरजांसाठी या योजनेतून मिळणारी रक्कम महिलांना मोठा आधार देते. त्यामुळे हप्ते वेळेवर मिळावेत, अशी अपेक्षा लाभार्थी महिलांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपात्र लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया शासनाकडून सुरूच आहे. योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कागदपत्रे, उत्पन्न निकष, इतर सरकारी योजनांचा लाभ आदी बाबींची तपासणी केली जात आहे.

निकषांबाहेर असलेल्या किंवा चुकीची माहिती देऊन लाभ घेतलेल्या महिलांना अपात्र ठरवून त्यांचा पुढील लाभ बंद करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. वेळेत ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात किंवा योजना रद्द होण्याची शक्यता आहे.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन आणि सोपी असल्याने महिलांना घरबसल्या ती पूर्ण करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News