PM Awas Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील नागरिकांचे जीवन उंचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात.
दरम्यान समाजातील बेघर नागरिकांसाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून काही विशेष योजना राबवल्या जात आहेत. आज आपण केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेची माहिती पाहणार आहोत.

जर तुमच्या नावावर स्वतःची जमीन किंवा प्लॉट असेल तर तुम्हाला शासनाच्या माध्यमातून त्या जमिनीवर घर बांधण्यासाठी आर्थिक मदत पुरवली जाते आणि यासाठी जी योजना केंद्रातील सरकारने सुरू केली आहे तिला पीएम आवास योजना असे नाव देण्यात आलय.
या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत देशातील हजारो, लाखो लोकांना लाभ मिळाला आहे. ज्या कुटुंबाकडे स्वतःचे हक्काचे पक्के घर नाही, झोपडीत राहतात किंवा बेघर आहेत अशा लोकांसाठी शासनाने ही योजना सुरू केली असून या अंतर्गत घर बांधण्यासाठी सरकार अनुदान स्वरूपात आर्थिक मदत पुरवत आहे.
पीएम आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या नावावर प्लॉट किंवा जमीन असल्यास त्यांना घर बांधण्यासाठी पीएम आवास योजनेतून दीड लाख रुपयांपर्यंत मदत केली जात आहे. विशेष म्हणजे यासाठी मोबाईल फोनवरून सुद्धा अर्ज करता येतो.
बेघर नागरिकांना पक्के घर देण्यासाठी ही योजना सुरू झाली आहे. पीएम आवास योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षण झाल्यानंतर आवास योजनेची यादी प्रसिद्ध होते.
या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. या योजनेचा आत्तापर्यंत लाखो कुटुंबांना फायदा झाला आहे. 2025 मध्ये देखील या योजनेतून अनेक लोकांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे.
दरम्यान ज्या लोकांनी या योजनेसाठी अर्ज केले आहे त्यांच्या घरी सर्वेक्षण सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांनी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या घरी पडताळणी होणार असून यासाठी एक विशेष पथक अर्जदारांच्या घरी जाणार आहे.
किंबहुना काही ठिकाणी पडताळणीचे काम सुरू झाले आहे. पडताळणी दरम्यान अर्जदारांना काही कागदपत्रे सादर करावी लागतात. अर्जदारांनी अर्ज करताना अपलोड केलेली सर्व कागदपत्रे पथकातील अधिकाऱ्यांना दाखवावे लागतात.
यामुळे अर्ज करताना जी कागदपत्रे तुम्ही दिलेली असतील ती सर्व कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. पीएम आवास योजनेच्या फॉर्म ची प्रिंट आऊट काढून ठेवणे सुद्धा गरजेचे राहणार आहे. जमिनीची कागदपत्रे सातबारा उतारा इत्यादी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे.
पडताळणी वेळी ही कागदपत्रे मागितलीच जातील असे नाही पण अधिकाऱ्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारल्यास किंवा कागदपत्रांची मागणी केल्यास त्यावेळी तुम्हाला हे कागदपत्रे लगेच देता येणार आहेत. दरम्यान सर्वेक्षण झाल्यानंतर पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर त्यांना घर बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या नावावर जमीन असणाऱ्या प्रत्येक पात्र कुटुंबाला 1.20 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात आहे. मैदानी भागातील कुटुंबांना 1.20 लाख रुपये आणि डोंगराळ भागातील कुटुंबांना 1.30 लाख रुपये अशी मदत दिली जाते.
हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होतात. या योजनेसाठी इच्छुक लोकांना मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करता येतो. नागरिकांना हवे असल्यास ते सीएससी सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता.













