करोडपती बनवणारा शेअर….; 8.15 रुपयांच्या स्टॉकची किंमत पोहोचली 1,500 रुपयांवर ! एक लाख रुपये गुंतवणारे सुद्धा झालेत करोडपती

Published on -

Share Market News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी फारच खास ठरणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे आणि यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

पण शेअर बाजारात असे काही स्टॉक आहे ज्यांनी गुंतवणूकदारांना चढउताराच्या काळात सुद्धा चांगले रिटर्न दिले आहेत. यात अनेक पेनी स्टॉक्स सुद्धा आहेत. या कमी किमतीच्या शेअर्सने सुद्धा लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत.

दरम्यान आज आपण अशा एका पेनी स्टॉकची माहिती पाहणार आहोत ज्याने लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. जिंदाल फोटो लिमिटेड (Jindal Photo Ltd.) या कंपनीच्या शेअर्सने मागील सात महिन्यांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवली आहे.

यात केलेली एक लाख रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारी ठरली असल्याने हा स्टॉक सध्या चर्चेत आहे. दरम्यान आता आपण या शेअरची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कोरोना काळात किंमत होती फक्त आठ रुपये 

कोविड काळात अर्थात एप्रिल 2020 मध्ये जिंदाल फोटोचा शेअर फक्त 8.15 रुपयांवर व्यवहार करत होता. मात्र पाच वर्षात या स्टॉक ची किंमत पंधराशे रुपयांवर पोहोचली.

डिसेंबर 2025 मध्ये हा स्टॉक 1500 ते 1600 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय आणि यामुळे हा स्टॉक सध्या फोकस मध्ये आहे. या शेअर्सने मागील पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडोचे रिटर्न दिले आहेत. 

एका लाखाचे झालेत 1.86 कोटी रुपये 

शेअर मार्केट मधून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या स्टॉकने गेल्या पाच वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 18,550% इतके जबरदस्त रिटर्न दिले आहेत.

थोडक्यात जर एखाद्या गुंतवणूकदाराने सन 2020 मध्ये या कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते आणि ही गुंतवणूक आजपर्यंत होल्ड करून ठेवली असती तर त्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.86 कोटी रुपये झाले असते. अर्थात एक लाख रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदाराला करोडपती बनवून गेली असती.

2020 ते 2025 मध्ये शेअरची किंमत कशी राहिली ?

एप्रिल 2020 मध्ये या कंपनीचा स्टॉक आठ ते नऊ रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत होता. यानंतर जानेवारी 2021 मध्ये स्टॉकची किंमत 25 रुपयांवर पोहोचली. पुढे 2021 च्या शेवटी स्टॉकची किंमत 253 रुपयांच्या रेंजमध्ये गेली.

2022 मध्ये स्टॉकची किंमत 348 रुपये झाली. 2023 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने 594 रुपयांचा टप्पा गाठला. यानंतर 2024 मध्ये 926 रुपये आणि 2025 च्या डिसेंबर महिन्यात हा स्टॉक 1500 ते 1600 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News