शेअर मार्केट गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात मिळणार मोठी भेट ! ‘या’ 4 कंपन्या देणार Bonus Share, रेकॉर्ड तारीख जाहीर

Published on -

Bonus Share News : पुढचा आठवडा शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी मोठा महत्त्वाचा राहणार आहे कारण की पुढील आठवड्यात चार मोठ्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शेअर मार्केट गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात कमाईचे सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे कारण की चार बड्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वाटप करणार आहेत.

दरम्यान जर तुम्हीही बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. कारण की आज आपण पुढील आठवड्यात कोणत्या चार कंपन्या बोनस शेअर्सचे वाटप करणार आणि याची रेकॉर्ड तारीख काय असणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरे तर मार्केटमधील कंपन्या सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स लाभांश अशी भेट देत असतात. आता पुढील आठवड्यात वित्त तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा सेक्टर मधील चार बड्या कंपन्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची भेट देणार अशी बातमी समोर आली आहे.

 या कंपन्या देणार बोनस शेअर्स

Unifinze Capital India Limited : ही कंपनी वित्तीय सेवा देणारी एक अग्रगण्य कंपनी असून ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वितरण करणार आहे. देशातील या आघाडीच्या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना 4:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरित करण्यात येणार आहेत.

याचाच अर्थ ही कंपनी प्रत्येक बोनस शेअर साठी चार बोनस शेअर्स वितरित करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्यापासून कंपनीचे शेअर्स फोकस मध्ये आहेत. या बोनस शेअर्स साठी कंपनीकडून 19 डिसेंबर रेकॉर्ड तारीख फायनल करण्यात आले आहे.  

Dr. Lal PathLabs Limited : हेल्थ सेक्टर मधील हे कंपनी सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची वितरण करणार आहे आणि यासाठीची रेकॉर्ड डेट पण फायनल करण्यात आली आहे.

ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर वितरित करणार आहे म्हणजेच एका शेअरवर एक शेअर फ्री दिला जाणार आहे. यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने 19 डिसेंबर 2025 ही रेकॉर्ड तारीख फायनल केली आहे.

Sylph Technologies Limited : आयटी सेक्टर मधील ही कंपनी सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वितरण करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांना 5:11 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यास मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

याचा अर्थ गुंतवणूकदारांना प्रत्येक 11 शेअर्ससाठी 5 शेअर्स फ्री मध्ये दिले जाणार आहेत आणि यासाठी 17 डिसेंबर रेकॉर्ड तारीख म्हणून फायनल करण्यात आली आहे.

Moneybox Finance Limited : ही कंपनी सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. पुढील आठवड्यात ही फायनान्स कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. यासाठी 15 डिसेंबर ही रेकॉर्ड तारीख सेट करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News