10th And 12th Students : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही पण दहावी किंवा बारावीच्या वर्गात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे.
खरे तर आता दहावीचे आणि बारावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आयोजित करण्यात आली असून बोर्डाकडून याचे वेळापत्रक अलीकडे जाहीर करण्यात आले आहे.

वेळापत्रक जाहीर झाल्यापासून दहावी आणि बारावीचे विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. दरम्यान आता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे बोर्ड परीक्षा देण्याआधी विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचे आयडी कार्ड सादर करावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा द्यायची असल्यास त्यांना अपार आयडी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्णय नुकताच महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून घेण्यात आला असून यानुसार आता कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या नव्या निर्णयानुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीट साठी अपार आयडी बंधनकारक करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची अपार आयडी असेल त्यांनाच डिजिटल मार्कशीट मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की अपार आयडीमुळे दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिली जाणारी गुणपत्रिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अपार आयडी मध्ये केलेली नोंदणी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुलभ करणार आहे तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देणार आहे.
डिजिलॉकरमध्ये विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड आयुष्यभरासाठी असतील. येथे विद्यार्थ्यांचे सर्व रेकॉर्ड सुरक्षित व एकत्रित डिजिटल स्वरूपात ठेवले जाणार आहेत. यंदाच्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीला ऍडमिशन आहे त्यांच्या बोर्ड एक्झाम फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये होणार आहे.
याच होऊ घातलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आता बोर्डाकडून अपार आयडी असणे अनिवार्य झाले आहे. याचा फायदा असा होणार आहे की निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका थेट विद्यार्थ्यांच्या डिजिलॉकर मध्ये मिळणार आहे.
याचा फायदा म्हणून विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया आणखी सोपे आणि जलद होईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक दस्तऐवज जसे की गुणपत्रिका , प्रमाणपत्र एकाच ठिकाणी सुरक्षितपणे साठवले जाणार आहेत.













