पुणे मेट्रो बाबत महत्त्वाची अपडेट ! 27 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीस यांनी दिली माहिती

Published on -

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे नव अपडेट आहे पुणे मेट्रोबाबत. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रो संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार वेगाने सुरू असून, येत्या दोन वर्षांच्या कालावधीत पुण्याला आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन वर्षात पुण्याला आणखी २७ किलोमीटर लांबीच्या नवीन मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.  हा नवा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर पुणेकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.

ही महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. हिवाळी अधिवेशनावेळी ते राज्य विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच विधानसभेत राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती देत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

राज्यातील विविध मेट्रो प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पुणे मेट्रोचा सध्या ३३ किलोमीटर लांबीचा मार्ग पूर्ण झाला असून, या मार्गावरून दररोज सरासरी २.२३ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेता मेट्रो प्रकल्प शहरासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. सध्या पुण्यात अतिरिक्त ४५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचे काम विविध टप्प्यांत प्रगतीपथावर असून, यापैकी २७ किलोमीटरचा टप्पा पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील इतर मेट्रो प्रकल्पांचाही सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, मुंबईत आतापर्यंत एकूण ९१ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे कार्यरत असून, दररोज सुमारे ९ लाख ५० हजार प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत.

मुंबई महानगर प्रदेशात सध्या १७०.४० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचे बांधकाम सुरू आहे. यापैकी पुढील दोन वर्षांत तब्बल १३२ किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. दरवर्षी ५० ते ६० किलोमीटर मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर शहरातही मेट्रो प्रकल्प वेगाने पुढे जात असून, आतापर्यंत ४० किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण झाला आहे. या मार्गावरून दररोज सुमारे १.१ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. नागपूरमध्ये आणखी ४३ किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून, ते देखील पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

या आकडेवारीवरून पुणे, मुंबई आणि नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांतील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर राज्य सरकारचा विशेष भर असल्याचे स्पष्ट होते. मेट्रो प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा वेळ, इंधन आणि खर्च वाचण्यास मोठी मदत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News