शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! ही कंपनी देणार 3 बोनस शेअर्स, वाचा सविस्तर

Published on -

Bonus Share : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट बोनस शेअर्स देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर मार्केटमधील अनेक कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि लाभांश देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

आता शेअर मार्केटमध्ये सातत्याने मजबूत कामगिरी करणाऱ्या ए-1 लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना फ्री शेअर वाटप करणार असून कंपनीच्या माध्यमातून आपल्या शेअर्सचे विभाजन सुद्धा केले जाणार आहे.

गुंतवणूकदारांना भरीव रिटर्न देणारी ही कंपनी आता बोनस शेअर्स वितरित करणार आहे. तसेच कंपनीकडून स्टॉक स्प्लिट पण केले जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने यासाठीची रेकॉर्ड तारीख सुद्धा जाहीर केली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सोमवारी शेअर मार्केट बंद झाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे सध्या गुंतवणूकदारांमध्ये फारच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय.

ए-1 लिमिटेड प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स देणार आहे. यासोबतच कंपनी आपल्या शेअर्सचे 10 भागांमध्ये विभाजन (स्टॉक स्प्लिट) करणार आहे. स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 1 रुपयांपर्यंत कमी होणार आहे.

यामुळे लहान गुंतवणूकदारांसाठी शेअर अधिक परवडणारा ठरण्याची शक्यता आहे. कंपनीने 22 डिसेंबर 2025 ही बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांची नावे या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असतील, तेच गुंतवणूकदार बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी पात्र असतील.

विशेष म्हणजे, ए-1 लिमिटेडने याआधी 2021 मध्ये बोनस शेअर्स दिले होते आणि तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. शेअर बाजारातील कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, ए-1 लिमिटेडचा शेअर सध्या बीएसईवर 1927 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय.

गेल्या तीन महिन्यांत शेअरच्या किमतीत 114 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर 2025 मध्ये आतापर्यंत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 386% इतके रिटर्न दिले आहेत. ह्या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 2250.84 कोटी रुपये इतके आहे.

तसेच गेल्या दोन वर्षांच्या काळात या शेअरच्या किमती 437% इतकी जबरदस्त वाढ सुद्धा नमूद करण्यात आली आहे. मागील पाच वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 3191% इतके जबरदस्त रिटर्न दिले आहेत आणि म्हणूनच या कंपनीचे स्टॉक सध्या शेअर मार्केटमध्ये चर्चेत आहेत.

कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरित करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याने आता या कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. आता कंपनीच्या या घोषणेनंतर शेअर्सकडे विशेष लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News