Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे ती म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते आता लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. लाडक्या बहिणी नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
नोव्हेंबर चा हप्ता गेल्या महिन्यातच मिळणे अपेक्षित होते मात्र आता नोव्हेंबर महिना उलटूनही हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळतं आहे.

डिसेंबर महिना सुरू होऊन आता जवळपास 17 दिवसांचा कालावधी उलटला आहे आणि तरीही अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर चा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे महिलांच्या मनात एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हे दोन्ही हप्ते लांबणीवर पडले असल्याने आता महिलांच्या माध्यमातून दोन्ही महिन्यांचे पैसे सोबतच मिळणार का असाही सवाल उपस्थित होतोय. दरम्यान आता या योजनेच्या दोन्ही महिन्यांचे पैसे कधी पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात वर्ग होऊ शकतात या संदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार लाडके बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर चा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो. 23 आणि 24 डिसेंबर 2025 रोजी महिलांच्या खात्यात हे दोन्ही हप्ते एकत्रितरित्या जमा होतील अशी माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच दोन-तीन दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच नोव्हेंबर आणि डिसेंबर चा हप्ता एकाच वेळी महिलांना मिळणार का आणि हा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान लाडक्या बहिणींना केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून केवायसीची प्रक्रिया अनिवार्य आहे यामुळे जे या मुदतीत केवायसी करणार नाही त्यांना यापुढे लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे लाडक्या बहिणींना केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका सुधारण्यासाठी सुद्धा सरकारने एक वेळा संधी दिलेली आहे आणि चुका सुधारण्यासाठी पण 31 डिसेंबर पर्यंत मुदत मिळालेली आहे.
यामुळे ज्यांनी केवायसी केली असेल पण केवायसी करताना काही चुका झाल्या असतील तर त्यांना या चुका दूर करता येणार आहेत.













