Silver Rate: नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. दरम्यान नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण नवीन वाहन नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहेत तर गुंतवणूकदार नवीन ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान जर तुम्हालाही नव्या वर्षात सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. विशेषता आजची ही बातमी जे चांदीमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असतील त्यांच्यासाठी खास राहणार आहे.

कारण की 2026 मध्ये चांदीची किंमत किती पर्यंत वाढू शकते ? याबाबत तज्ञांचे नेमके म्हणणे काय आहे ? याविषयी आज आपण या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर 2025 हे वर्ष सिल्वर मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी विशेष फायद्याचे राहिले आहे चांदीने खऱ्या अर्थाने यावर्षी गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची खरंच चांदी झाली आहे, पण 2026 हे वर्ष तसंच राहणार का ? येत्या वर्षातून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळणार का? हे सवाल आजही कायम आहेत.
चांदीची किंमत अडीच लाखांचा टप्पा गाठणार का?
एमसीएक्सवर चांदीने ऐतिहासिक टप्पा ओलांडत प्रति किलो 2 लाख रुपयांचा स्तर गाठला आहे. यामुळे आता चांदी अडीच लाखांचा टप्पा गाठणार का हा मोठा प्रश्न आहे आणि याच बाबत तज्ञांकडून पण महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
खरे तर यावर्षी चांदीमध्ये जी त्याची आली आहे त्यामुळे कमोडिटी बाजारात मोठी खळबळ उडवली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्यानंतर जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाचा थेट फायदा चांदीला झाला.
मजबूत ग्लोबल सेंटिमेंट, डॉलरमधील कमजोरी आणि औद्योगिक मागणीतील वाढ यामुळे चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला. मात्र, शुक्रवारी मोठ्या प्रमाणात नफा-वसुली झाल्याने चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण पाहायला मिळाली.
काही गुंतवणूकदारांनी नफ्यासाठी पोझिशन्स क्लोज केल्यामुळे बाजारात दबाव निर्माण झाला. तरीही, त्यानंतर सोमवारी चांदीमध्ये पुन्हा जोरदार तेजी दिसून आली असून, बाजारातील तेजी कायम असल्याचे संकेत मिळत आहेत.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या दरात दीर्घकालीन तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील टप्प्यात चांदी 1.70 लाख ते 1.78 लाख रुपये प्रति किलोपर्यंत घसरू शकते. ही घसरण ‘बाय ऑन डिप्स’साठी चांगली संधी ठरू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
2026 पर्यंत चांदी 2.4 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा गाठू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीनेही चांदी मजबूत स्थितीत आहे. 2011 ते 2025 दरम्यानचा दीर्घ एकत्रीकरण कालावधी संपुष्टात आला असून, मंथली चार्टवर ‘राउंडिंग बॉटम ब्रेकआउट’ दिसून येतो.
20 आणि 60 महिन्यांचे ईएमए वरच्या दिशेने असून, सध्याच्या किमती त्यापेक्षा बर्याच वर ट्रेड करत आहेत, जे सुरुवातीच्या तेजीच्या सायकलचे संकेत मानले जात आहेत. चांदीच्या तेजीमागे औद्योगिक मागणी हा मोठा घटक ठरत आहे. सोलर पीव्ही पॅनेल, ईव्ही बॅटरी, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये चांदीचा वापर वाढत आहे.
यासोबतच पुरवठ्याची कमतरता, धातूंच्या वाढत्या किमती आणि कमोडिटी प्रवाहातील बदल यामुळे चांदीला अतिरिक्त आधार मिळत आहे. पण तरीही, मजबूत अमेरिकन डॉलर, वाढणारे वास्तविक उत्पन्न, भू-राजकीय तणावात घट आणि कमोडिटी रोटेशन हे जोखीम घटक लक्षात घेणे आवश्यक राहणार आहे.













