आजपासून पुढील 5 दिवस बँका बंद राहणार ! महाराष्ट्रातील बँका पण 4 दिवस बंद राहणार, वाचा सविस्तर

Banking News : 2025 हे वर्ष आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांनी नववर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान हा डिसेंबर महिना बँक ग्राहकांसाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. वर्षाचा शेवटचा महिना म्हणून डिसेंबर हा आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.

मात्र देशातील बँक ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. ह्या वर्षाच्या शेवटी उत्पन्न-खर्चाचा हिशोब, बचत, गुंतवणूक तसेच बँकिंग व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँक ग्राहक बँकांमध्ये गर्दी करत आहेत.

देशातील अनेक नागरिक बँकांकडे धाव घेत आहेत. मात्र, डिसेंबर महिन्यात विविध राष्ट्रीय व स्थानिक सण, तसेच साप्ताहिक सुट्ट्यांमुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर आधीच सुट्ट्यांची माहिती जाणून घेणे आवश्यक ठरणार आहे.

आजपासून म्हणजेच 18 डिसेंबरपासून काही राज्यांमध्ये सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. राज्यांनुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असल्याने नागरिकांनी आपल्या शहरातील बँक शाखेकडून खात्री करून घेणे अधिक योग्य ठरेल.

दरम्यान आता आपण 18 डिसेंबर पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत देशातील कोणत्या राज्यांमधील बँका कोणत्या तारखांना बंद राहणार याची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

या तारखेला बंद राहणार बँक 

18 डिसेंबर : मेघालय आणि छत्तीसगडमध्ये बँका बंद राहणार आहेत. मेघालयमध्ये यू सोसो थम यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर छत्तीसगडमध्ये गुरु घासीदास जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दोन राज्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी बँक सेवा सुरू राहणार आहे.

19 डिसेंबर : गोव्यात गोवा स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद राहतील. मात्र, या दिवशी ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार आहे.

20 डिसेंबर : सिक्कीममध्ये स्थानिक लोसूंग आणि नामसूंग सणामुळे बँका बंद असतील.

21 डिसेंबर : रविवार असल्याने देशभरातील सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

22 डिसेंबर : सिक्कीममध्ये बँका बंद राहणार असून, त्यामुळे त्या राज्यात सलग तीन दिवस बँक सेवा उपलब्ध राहणार नाही.

24 डिसेंबर : नागालँड, मेघालय आणि मिझोरममध्ये ख्रिसमस ईव निमित्त बँका बंद राहतील.

25 डिसेंबर : ख्रिसमस सणामुळे देशभरातील सर्व बँका बंद असतील.

26 डिसेंबर : काही ईशान्य राज्यांमध्ये ख्रिसमसची अतिरिक्त सुट्टी असेल.

27 डिसेंबर : चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

28 डिसेंबर : रविवार असल्याने बँका बंद राहतील.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातील बँका चार दिवसांसाठी बंद राहणार आहेत. 21, 25, 27 आणि 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व सहकारी, सरकारी आणि खाजगी बँका बंद राहणार आहेत.