Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पीएम किसान योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी योजना.
या योजनेचा देशातील जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते.

आतापर्यंत पीएम किसान च्या लाभार्थ्यांना एकूण 21 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. 21 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. 21 वा हप्ता पीएम मोदी यांनी तामिळनाडू मधून देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला.
21 व्या हप्त्यापोटी देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 18000 कोटी रुपयांचा लाभ जमा झाला. दरम्यान फेब्रुवारी 2026 मध्ये पात्र ठरणारे शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळू शकतो असा दावा प्रसार माध्यमांमध्ये केला जातोय. पण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 22 वा हप्ता फक्त ज्या लोकांकडे फार्मर आयडी असेल त्यांनाच मिळणार असल्याचेही वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता पीएम किसान च्या लाभार्थ्यांना फार्मर आयडी जोडल्याशिवाय हप्ता मिळणार नाही. यामुळे नव्या वर्षात दिल्या जाणाऱ्या 22 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल
तर पीएम किसान च्या लाभार्थ्यांना फार्मर आयडी जोडणे आवश्यक राहणार आहे. अशा स्थितीत आता आपण शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कसा काढावा याबाबतची माहिती या लेखातुन जाणून घेणार आहोत.
फार्मर आयडी तयार करण्याची प्रोसेस कशी आहे?
फार्मर आयडी तयार करण्यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवर जावे लागेल. येथे शेतकऱ्यांना क्रिएट न्यू यूजर वर क्लिक करून अटी शर्ती स्वीकारून आधार लिंक मोबाईलवर आलेल्या OTP ने व्हेरिफिकेशन करायचे आहे.
मग नवीन पासवर्ड तयार करून लॉगिन करावे. यानंतर शेतकऱ्यांना जमिनीशी संबंधित माहिती भरायची आहे. यामध्ये फार्मर टाईप या पर्यायात Owner हा ऑप्शन निवडायचा आहे. मग फेच लँड डिटेल यावर क्लिक करून सातबारा क्रमांक व जमिनीची इतर आवश्यक माहिती भरायची आहे.
यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागेल. सोशल रजिस्ट्रीमध्ये फॅमिली आयडी / रेशन कार्ड माहिती भरावी लागेल. मग Department Approval मध्ये Revenue Department निवडायचे आहे. पुढे Consent देऊन डिजिटल स्वाक्षरी करायची आहे.













