पुणे आणि अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी ! नगर रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल, प्रशासनाचा निर्णय काय?

Pune News : पुणे तसेच अहिल्यानगरकरांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर शौर्य दिनानिमित्ताने प्रशासनाच्या माध्यमातून वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. दरवर्षी एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्ताने विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे भीम अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

1 जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यनगरीत दाखल होत असतात. अशा स्थितीत दरवर्षी प्रशासनाला शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करावे लागतात आणि यंदा देखील प्रशासनाने वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. अशा स्थितीत जर तुम्ही शौर्य दिनानिमित्ताने पुण्यात विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल होणार असाल किंवा या भागातून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

पुण्यात दाखल होणाऱ्या लाखो अनुयायांची गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच नगर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी शौर्यदिनानिमित्ताने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

दरम्यान वाहतुकीत करण्यात आलेले बदल बुधवारी दुपारी लागू होतील. बुधवारी दोन वाजेपासून ते एक जानेवारी 2026 रोजी मध्ये रात्रीपर्यंत हे बदल कायम राहणार आहेत. दरम्यान आता आपण शौर्य दिनानिमित्ताने वाहतूक पोलिसांकडून नेमके वाहतुकीत काय बदल करण्यात आले आहेत हे समजून घेऊयात.

वाहतुकीत झालेले बदल

पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्यांना खराडी बायपासवरून वळवले जाणार आहे. या बायपास वरून पुढे मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रोड, केडगाव चौफुला, न्हावरा आणि शिरूरमार्गे लोकांना इच्छित स्थळी जाता येणार आहे.

या कालावधीत राजधानी मुंबईतून येणाऱ्या लोकांना वडगाव मावळ-चाकण-खेड-मंचर-नारायणगाव-आळेफाटा या मार्गाचा वापर करण्यास सांगितले गेले आहे. पण हलकी वाहने पाबळ-शिरूर मार्गे सुद्धा आपापल्या इच्छितो स्थळी जाऊ शकणार आहेत.

सांगली सातारा कोल्हापूर या भागाकडून येणाऱ्या वाहनांना मांतरवाडी फाटा, हडपसर आणि केडगाव चौफुला मार्गे शिरूरकडे जाता येणार अशी माहिती वाहतुक पोलिसांनी दिली आहे.

सोलापूर रोड कडून येणाऱ्या लोकांना हडपसर-मगरपट्टा चौक-खराडी बायपास आणि विश्रांतवाडी मार्गे पुढे प्रवास करता येईल असे सुद्धा प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे शहरातील काही भागांमध्ये जड वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामुळे या कालावधीत जड वाहनाच्या चालकांनी योग्य ती माहिती घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.