Maruti Suzuki Grand Vitara Electric : नवीन कार घेण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. ही बातमी नव्याने इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचे राहणार आहे कारण की आज आपण अशा एका इलेक्ट्रिक वेहिकल ची माहिती जाणून घेणार आहोत जी गाडी अजून भारतात लॉन्च पण झालेली नाही पण भारतात तयार झाली असून विदेशात या गाडीची मोठ्या प्रमाणात धूम सुरू आहे.
ग्लोबल मार्केटमध्ये ही गाडी गेल्यावर्षी लोणचे झाली असून लॉन्चिंग पासून आत्तापर्यंत या गाडीचे एकूण 13000 युनिट विकले गेले आहेत आणि भारतात तयार झालेल्या या गाडीची सर्वाधिक मागणी युरोपमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जर तुम्हाला ही यंदा इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी या गाडीचा ऑप्शन बेस्ट ठरणार आहे. खरे तर मारुती सुझुकी भारतात 2026 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे ई-विटारा. ही गाडी लॉन्चिंग आधीच आपल्याकडे चर्चेत पण आली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये या गाडीची ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्चिंग झाली आणि त्यानंतर लगेचच निर्यात सुद्धा सुरू झाल्याने, या इलेक्ट्रिक वाहनाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जोरदार प्रवेश केला.
आजपर्यंत, ई-विटाराच्या 13 हजाराहून अधिक युनिट्स 29 देशांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये युरोप ई-विटाराची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. इतक्या कमी वेळात मिळवलेली ही कामगिरी स्पष्टपणे दर्शवते की भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक वाहने आता जागतिक ग्राहकांचा विश्वास मिळवत आहेत.
गाडीचे प्रोडक्शन कुठे सुरू आहे
ई-विटाराचे प्रोडक्शन महाराष्ट्र शेजारील गुजरात राज्यात सुरू आहे. येथे उत्पादित होणारी वाहने पिपावाव बंदरमार्गे अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यात केली जात आहेत. कंपनीने ईव्ही स्वीकारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा देखील केली आहे.
मारुती सुझुकी या दशकाच्या अखेरीस देशभरात एक लाखापेक्षा अधिक सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्स तयार करण्यात योगदान देईल अशी पण माहिती समोर आली आहे. म्हणजेच पुढील काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा राहणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी ग्राहकांना काळजी करण्याची गरज राहणार नाही.
ई विटाराचा परफॉर्मन्स आणि रेंज चांगली राहणार असा दावा कंपनीने केला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी तब्बल 543 km पर्यंत धावणार असल्याची माहिती कंपनीकडून समोर येत आहे. ही गाडी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. यामुळे फक्त 50 मिनिटांमध्ये ही गाडी शून्यापासून 80% पर्यंत चार्ज होईल.
या गाडीमध्ये दोन बॅटरी पर्याय दिलेले राहतील. गाडी हे पूर्णतः सुरक्षित राहणार आहे. ही गाडी फाईव्ह स्टार सेफ्टीने सज्ज राहील आणि यात 10.25-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड पॉवर सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, 7 एअरबॅग्ज आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजी असे प्रमुख फीचर्स दिले जाणार आहेत. याशिवाय, त्यात लेव्हल-2 एडीएएस देखील देण्यात आला आहे. मारुती ई विटाराला भारत एनसीएपीमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग सुद्धा मिळाले आहे.













