Toyota चा ‘हा’ घोडा आता भारतीय कार मार्केट मधून हद्दबाहेर होणार ! कंपनी लोकप्रिय MPV बंद करणार

Published on -

Toyota MPV : टोयोटाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंपनी आता आपल्यालाईन अप मधील एक महत्त्वाची एमपीवी बंद करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार टोयोटा कंपनी आपली लोकप्रिय एमपीव्ही इनोवा क्रिस्टा लवकरच बंद करणार आहे.

स्वतः कंपनीकडून या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. भारतात या गाडीला ‘रस्त्यांचा राजा’ म्हणून ओळखतात. खरे तर भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून ही गाडी डिझाईन करण्यात आली होती. भारतीय रस्त्यांची बनावट अन ग्रामीण भागातील खराब रस्ते या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही गाडी डिझाईन करण्यात आली.

मात्र आता ही गाडी लवकरच हद्द बाहेर होणार आहे. खरंतर या गाडीचा प्रवास जवळपास एक दशक जुना आहे. ही गाडी सर्वप्रथम 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि तेव्हापासून ही गाडी ग्राहकांची पहिली पसंत राहिली आहे. ज्या लोकांना मोठी गाडी घ्यायची असते ते लोक या गाडीचा आवर्जून विचार करतात.

मात्र आता ही गाडी कायमची बंद करण्यात येणार आहे. एक दशक म्हणजेच दहा वर्षांचा प्रवास आता समाप्त होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टोयोटा कंपनी इनोव्हा क्रिस्टाच्या डिझेल मॉडेल येत्या काही महिन्यांनी बंद करू शकते. मार्च 2027 पर्यंत कंपनी इनोव्हा क्रिस्टाचे डिझेल व्हेरिएंट बंद करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

भारत सरकारच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यासाठी उत्सर्जन नियम कठोर केले जात आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस कठोर होत चाललेले उत्सर्जन नियम आणि कंपनीचा हायब्रिड तंत्रज्ञानाकडे वाढलेला कल, हे या निर्णयामागचे प्रमुख कारण मानले जात आहे. ऑटोकार इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, भारत सरकार ‘कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी’ (CAFE) नियमांचा तिसरा टप्पा लवकरच लागू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या टप्प्यात वाहन उत्पादकांवर सरासरी कार्बन डायऑक्साइड ($CO_2$) उत्सर्जन आणखी कमी करण्याचा दबाव असणार आहे.

मोठ्या क्षमतेच्या डिझेल इंजिन असलेल्या वाहनांसाठी हे नियम पाळणे अत्यंत खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या अवघड ठरू शकते. इनोव्हा क्रिस्टा ही लॅडर-फ्रेम चेसिसवर आधारित जड एमपीव्ही आहे. तिचे डिझेल इंजिन ताकदवान असले तरी उत्सर्जनाच्या बाबतीत ती हायब्रिड किंवा आधुनिक पेट्रोल इंजिनांच्या तुलनेत मागे पडते.

अशा गाड्या विक्रीत ठेवण्यात आल्यास टोयोटाला मोठ्या आर्थिक दंडाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच कंपनी इनोव्हा हायक्रॉस या हायब्रिड मॉडेलवर अधिक भर देताना दिसत आहे. हायक्रॉस ही अधिक पर्यावरणपूरक असून तिची इंधन कार्यक्षमता जास्त आहे. मात्र, इनोव्हा क्रिस्टा आणि हायक्रॉस यांच्या किंमतीत मोठा फरक आहे.

क्रिस्टावर अवलंबून असलेले व्यावसायिक ग्राहक, विशेषतः टॅक्सी चालक, हा फरक कसा पेलणार, हा प्रश्न टोयोटासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. २०१६ मध्ये लाँच झाल्यापासून इनोव्हा क्रिस्टाने भारतीय एमपीव्ही बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

दमदार २.४ लिटर डिझेल इंजिन, विश्वासार्हता आणि कमी देखभाल खर्च यामुळे ती लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि व्यावसायिक वापरासाठी पहिली पसंती ठरली. सध्या ही गाडी केवळ डिझेल आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे.

नवीन तंत्रज्ञान, बदलती ग्राहकांची आवड आणि पर्यावरणपूरक वाहनांकडे झुकणारा बाजार पाहता, इनोव्हा क्रिस्टाचा डिझेल अवतार निवृत्त होण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News