Maharashtra Government Employees : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर नुकतीच नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. 2025 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जस खास ठरल तसच 2026 हे वर्ष पण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष आनंदाचे राहणार असा विश्वास व्यक्त होतोय.
त्यातल्या त्यात जानेवारी महिना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरणार अशी आशा आहे. खरेतर, राज्य शासनाकडून जानेवारी महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ देण्यात येणार असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे.

महागाईच्या वाढत्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी हे तिन्ही पण निर्णय अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. दरम्यान आता आपण या महिन्यात कर्मचाऱ्यांना नेमके कोणते तीन लाभ मिळणार याची माहिती जाणून घेऊयात.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ
महागाई भत्ता : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. 2026 मध्ये देखील दोन हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. त्याआधी गेल्या वर्षाची एक महागाई भत्ता वाढ प्रलंबित आहे आणि त्याबाबत या महिन्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारकडूनही जानेवारी महिन्यात 3 टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात येणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 55 टक्के महागाई भत्ता मिळत असून, ही वाढ लागू झाल्यानंतर तो 58 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. या वाढीमुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनात थेट वाढ होणार असून, महागाईशी सामना करण्यास मदत मिळणार आहे.
महागाई भत्ता थकबाकी मिळणार : खरे तर गेल्यावर्षी केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला होता आणि आता याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा तीन टक्क्यांनी वाढणार आहे आणि ही वाढ कधीपासून लागू होईल तर ही वाढ लागू होणार आहे
एक जुलै 2025 पासून. अर्थात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून महागाई भत्ता फरकाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 52 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून तीन टक्के वाढ झाल्यानंतर त्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवर जाणार आहे.
जानेवारी महिन्यात याचा शासन निर्णय जारी होईल आणि जानेवारी महिन्याच्या पगारांसोबत याचा रोख लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना वितरित होणार आहे. जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या काळातील एकूण महागाई भत्ता थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यात मोठी वाढ : तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा लाभ म्हणजे प्रोत्साहन भत्ता फरक. राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार, आदिवासी व नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष भत्ता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या 15 टक्के इतका असून, किमान 200 रुपये व कमाल 1500 रुपये इतक्या मर्यादेत अदा केला जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे हा भत्ता सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून म्हणजेच 1 जानेवारी 2006 पासून लागू मानला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीतील संपूर्ण फरकाची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
या तीन मोठ्या आर्थिक लाभांमुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.













