ब्रेकिंग : केवायसी केली तरी सुद्धा ‘या’ महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार नाही, लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय

Published on -

Ladaki Bahin Yojana : तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरंतर, लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती.

ही महाराष्ट्र राज्यातील आत्तापर्यंतची सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जात आहे. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात जवळपास अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळाला होता. यामुळे ही राज्यातील सर्वात मोठी योजना बनली आहे आणि वार्षिक 18 हजार रुपयांचा लाभ मिळत असल्याने महिलांमध्ये कमी दिवसात लोकप्रिय सुद्धा झाली आहे.

मात्र मध्यंतरी या योजनेचा काय अपात्र महिलांनी लाभ घेतला होता आणि म्हणूनच शासनाने या योजनेच्या लाभासाठी आता केवायसी करणे बंधनकारक केले आहे. तसेच ज्या महिलांनी केवायसी केलेली नसेल त्यांना याचा लाभ सुद्धा मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. केवायसी करण्यासाठी शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती.

या तारखेपर्यंत केवायसी केलेल्या महिलांना जाता लाभ मिळणार आहे. कारण की सरकारने केवायसी प्रक्रियेसाठी मुदत वाढ दिलेली नाही. वास्तविक सुरुवातीच्या टप्प्यात केवायसी प्रक्रियेसाठी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत होती. मात्र त्यावेळी असंख्य लाभार्थी केवायसी विना होते आणि म्हणूनच शासनाने केवायसी प्रक्रियेला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली.

मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर नंतर आता कोणालाच केवायसी करता येणार नाही. पण जर पोर्टलवर केवायसी प्रक्रिया सुरू राहिली आणि महिलांनी केवायसी केली तरीसुद्धा अशा महिलांना या योजनेतून वगळण्याची शक्यता आहे.

म्हणजेच मुदतीनंतर केवायसी केलेल्या महिलांना सुद्धा या योजनेतून बाद करण्यात येणार अशी माहिती आता समोर येत आहे. अर्थात शासनाने या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा केला जातोय.

डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार ?

नवीन वर्षाच्या सुरुवातीला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित केल्यानंतर आता डिसेंबर महिन्याच्या पैशांची आतुरता आहे. एक जानेवारी 2026 रोजी फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वर्ग केला होता आणि आता सगळ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

दरम्यान यावेळी सरकार डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे मकर संक्रांतीच्या आधी जमा करण्याची शक्यता असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. यामुळे 14 जानेवारीच्या आधी राज्यातील लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News