Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही पण लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी असाल तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी उपयोगाची राहणार आहे. मंडळी, सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे.
येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. खरंतर गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषद अर्थात नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्यात आणि आता या जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका संपन्न होणार आहेत. दरम्यान महापालिका मतदानाच्या आधी लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना 15 जानेवारी आधी म्हणजेच महापालिका निवडणुका आणि मकर संक्रांतीच्या आधी पुढील हफ्ते दिले जाणार आहेत. खरोखर 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे आणि 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाईल.
दरम्यान मकर संक्रांत आणि महापालिका निवडणुकांच्या मतदाना आधी राज्यातील लाडक्या बहिणींना पुढील दोन हप्ते अर्थात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते मिळू शकतात असा दावा केला जातोय. अद्याप फडणवीस सरकारकडून किंवा महिला व बाल विकास विभागाकडून या संदर्भात अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही.
मात्र महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या योजनेचे पुढील दोनही हप्ते म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना एकाच वेळी मिळतील असा दावा करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की लाडकी बहिण योजनेच्या जवळपास सव्वा दोन कोटी लाभार्थ्यांना 1 जानेवारी 2026 रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला.
खरे तर लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्या निर्णयात असे स्पष्ट नमूद आहे की, प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत संबंधित महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग होणार आहेत. पण अनेकदा लाभाची रक्कम उशिरा मिळते.
नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर चक्क दीड महिना उशिराने मिळाला. मात्र आता डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे हप्ते महापालिका मतदानाच्या आधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मकर संक्रांत असल्याने महिला स्वतःसाठी वाण, साड्या खरेदी करतात.
या सणाला मोठे महत्त्व आहे आणि हीच गोष्ट पाहता आता फडणवीस सरकार दोन महिन्यांचे पैसे वितरित करण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी अर्थात 2025 मध्ये पण लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे एकदम देण्यात आले होते.
दरम्यान महिला व बालविकास विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दहा ते 14 जानेवारी दरम्यान लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ दिला जाणार अशी माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब अशी की यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाकडे निधीची मागणी केली आहे. त्यामुळे सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणीच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत.












