Share Market News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे बहुतांशी गुंतवणूकदार दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओकडे विशेष लक्ष ठेवून असतात. दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओ मध्ये असणाऱ्या शेअर्समध्ये छोटे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.
अशा स्थितीत जर तुम्ही पण एखाद्या दिग्गज गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओ मधील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.

शेअर मार्केट मधील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी अलीकडेच एका शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे त्या शेअरच्या किमती जवळपास 60 टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत.
यामुळे दिग्गज गुंतवणूकदारांच्या या गुंतवणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरे तर शेअर मार्केटमध्ये नव्याने आलेल्या आणि उत्तम व्यवसाय असलेल्या कंपन्यांची निवड करणे गुंतवणूकदारांसाठी फारच अवघड असते. अशा नव्याने आलेल्या कंपन्यांच्या व्यवसायाबाबत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना विशेष माहिती नसते आणि यामुळे अनेकदा अशा शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक त्यांच्यासाठी रिस्की ठरते.
पण त्याच वेळी अशा नव्याने आलेल्या कंपन्यांच्या शेअर्सने जर चांगली कामगिरी केली तर गुंतवणूकदारांना नक्कीच मोठे रिटर्न पण मिळतात. दरम्यान, दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी डिजिटल ब्रँडटेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अशाच एका कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.
त्यांनी मार्केटमध्ये नव्याने दाखल झालेल्या एडकाउंटी मीडिया इंडिया लिमिटेड कंपनीत 2.89% गुंतवणूक केली असल्याची बातमी समोर आली आहे. कचोलिया अशा उदयन्मुख कंपन्यांच्या शोधासाठी विशेष ओळखले जातात.
दरम्यान त्यांनी शेअर्समध्ये प्रचंड घसरण झालेली असतानाही या कंपनीत केलेली गुंतवणूक सध्या चर्चेचा विषय ठरत असून यामुळे संबंधित कंपनीचे शेअर्स फोकस मध्ये आले आहेत. दरम्यान आज आपण या कंपनीबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
आयपीओमध्ये शेअरची किंमत काय होती?
एडकाउंटी मीडिया इंडिया लिमिटेड या कंपनीच्या आयपीओ मध्ये त्याच्या शेअरची किंमत फक्त 85 रुपये एवढी होती. दरम्यान या कंपनीच्या शेअरची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 130 रुपयांवर जबरदस्त लिस्टिंग झाली.
यानंतर काही दिवसातच कंपनीच्या शेअरची किंमत 282 पर्यंत पोहोचली. म्हणजे अवघ्या काही दिवसात गुंतवणूकदारांना 230 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळालेत. मात्र नंतर नफा वसुली करण्यासाठी अनेक लोकांनी या कंपनीचे शेअर्स विकलेत.
यामुळे शेअर्समध्ये तब्बल 60 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आणि शेअरच्या किमती शंभर रुपयांपर्यंत खाली आल्यात. मात्र एवढ्या मोठ्या घसरणीनंतरही हा स्टॉक आयपीओ प्राईस पेक्षा 25 टक्क्यांवर व्यवहार करत आहे.
दरम्यान कचोलिया यांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली असल्याची बातमी समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या या कंपनीचा स्टॉक 113 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. या कंपनीचे मार्केट कॅपिटल 255 कोटी रुपये एवढे आहे.












