Stock To Buy : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहे. मार्केटमध्ये सुरू असणारी चढ-उतार अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरले आहे. 2025 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी फारच आव्हानात्मक राहिले आहे.
गेल्या वर्षी अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत आणि यामुळे आता गुंतवणूकदार सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.

अशातच आता टॉप ब्रोकरेज हाऊस कडून काही शेअर सुचवण्यात आले आहेत जे येत्या काळात शेअर मार्केटमध्ये सुरू असणाऱ्या या चढउताराच्या काळात सुद्धा चांगले रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात.
हे पाच शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल
ओसवाल पंप्स : नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने या शेअर साठी बाय रेटिंग दिली आहे. अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली असून येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 43 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.
या शेअर साठी 720 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे अलीकडे सौर पंपाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून येत्या काळात सौर पंपाचा वापर आणखी वाढेल आणि याचा या कंपनीला फायदा होणार आहे.
औरिअनप्रो सोल्यूशन्स : चॉईस इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने या शेअर साठी बाय रेटिंग जाहीर केली आहे. हा स्टॉक येत्या काळात करंट मार्केट प्राइस पेक्षा तब्बल 72 टक्के रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
यासाठी ब्रोकरेज हाऊस कडून 1880 रुपयांची टार्गेट प्राईज सेट करण्यात आली आहे. यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये नवीन शेअर्स ॲड करायचे असतील तर तुम्ही या शेअरचा विचार करू शकता.
ग्रो : मोतीलाल ओसवाल यांनी ग्रो च्या शेअर साठी बाय रेटिंग दिलेली आहे. येत्या काळात या शेअर्स मधून गुंतवणूकदारांना 19 ते 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे. यासाठी ब्रोकरेज हाऊस कडून 180 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे.
टाटा मोटर्स : इनक्रेड इक्विटीजने टाटा समूहाच्या या शेअर साठी बाय रेटिंग जाहीर केली आहे. सध्या या स्टॉकची जी किंमत आहे त्यापेक्षा या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज आहे.
म्हणजे येत्या काळात गुंतवणूकदारांना या शेअर्समधून 18 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील असे बोलले जात आहे. यासाठी 513 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे.
अदानी पॉवर : जेएम फायनान्शिअलने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिलेली आहे. खरे तर या शेअरची करंट मार्केट प्राइस 148 रुपये एवढी आहे. पण येत्या काळात या स्टॉक ची किंमत 187 रुपयांचा टप्पा गाठणार असा अंदाज आहे.
म्हणजेच यातून गुंतवणूकदारांना येत्या काळात 20 ते 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात.













