लाडक्या बहिणींसाठी मंत्री गिरीश महाजन यांची मोठी घोषणा! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार दोन महिन्यांचे पैसे

Published on -

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

खरं तर लाडक्या बहिणींना एक जानेवारी 2026 रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला. आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि या चालू महिन्यातील म्हणजेच जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

खरंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्येक निवडणुकीत महायुतीसाठी वरदान ठरत आहे. या योजनेचा करिष्मा 2024 मध्ये संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळाला.

या अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो आणि हा आर्थिक लाभ महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवतोय. परिणामी या योजनेचा महायुतीला चांगला लाभ मिळाला आहे. गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये संपन्न झालेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा या योजनेचा महायुतीला प्रचंड लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान आता राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अंतर्गत येत्या 15 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि 16 तारखेला याचा निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना आता दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाणार आहेत. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

खरे तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे सोबत मिळतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही मात्र आता डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे सोबत येणार आणि याबाबत स्वतः महायुती मधील मंत्र्यांकडूनच अपडेट देण्यात आली आहे.

गिरीश भाऊंनी या योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये लवकरच दिले जातील अशी घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक सॅंडलवर असे लिहले आहे की, देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार.. मकर संक्रांतीची मोठी भेट !

14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3000 रुपये जमा होणार ! अर्थात मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांची भेट दिली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News