Havaman Andaj 2026 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. राज्यातील विदर्भ विभागात थंडीचे प्रमाण अधिक आहे.
विदर्भातील बहुतांशी भागांमध्ये दिवसा देखील उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. विदर्भातील नागपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता अधिक पाहायला मिळत आहे.

तसेच विदर्भात पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. राज्याच्या इतरही जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कायम आहे पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले आणि यामुळे तापमानात थोडी वाढ झाली आहे.
अशातच हवामान खात्याने येत्या 48 तासात किमान तापमान दोन ते तीन अंशानी वाढणार असा अंदाज दिला आहे. यामुळे थंडीत काहीशी घट येऊ शकते. पण उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दाट धुके पाहायला मिळू शकते आणि यामुळे वाहन चालकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
अशातच आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिणेकड हे चक्रीवादळ तयार झाल आहे आणि ते श्रीलंकेच्या दिशेने पुढे सरकत आहे.
मात्र याचा भारतातील किनारपट्टी राज्यांना मोठा फटका बसू शकतो. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढचे 48 तास हे किनारपट्टी राज्यांसाठी महत्त्वाचे राहणार आहेत. चक्रीवादळामुळे केरळपासून काही अंतरावर सायक्लोनिक सर्क्युलेशन सुद्धा तयार झालंय. या पार्श्वभूमीवर केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामानातील या बदलाचा महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम होणार आहे. राज्यातील कोकणात ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते. यामुळे कमाल तापमान वाढणार असून थंडीची तीव्रता थोडी कमी होणार आहे.
मात्र पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढणार आहे. विदर्भात सुद्धा हाड गोठवणारी थंडी आणि धुके पाहायला मिळणार आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात अलीकडेच कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते.
हेच कमी दाबाचे क्षेत्र आता डीप डिप्रेशन मध्ये कन्वर्ट झाले आहे. यामुळे चक्रीवादळ तयार झाले अन हे चक्रीवादळ सध्या 18 किलोमीटर वेगाने श्रीलंकेच्या दिशेने पुढे सरकत आहे. सध्याची स्थिती पाहत आहे चक्रीवादळ पुढील 36 तासात श्रीलंका किनारपट्टी ओलांडणार आहे.
मात्र या हवामान बदलाचा फटका दक्षिण भारताला बसेल. दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये या प्रणालीमुळे पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मात्र कुठेच पाऊस पडणार नाही. कोकण किनारपट्टीवर सुद्धा पावसाची शक्यता नाहीये पण या भागात काही ठिकाणी ढगाळ हवामान आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे.













