लाडकी बहिण योजना : नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हफ्त्याची तारीख ठरली, पण ‘या’ महिलांना मिळणार नाहीत पुढील हफ्त्याचे पैसे

Published on -

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आज एक महत्त्वाची माहिती समोर आली. लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकाच वेळी मिळणार आहेत.

राज्य सरकारकडून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही हप्त्यांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंत्री महाजन यांनी लाडक्या बहिणींना महापालिका निवडणुकांच्या आधीच दोन्ही हप्त्याचे पैसे दिले जातील अशी घोषणा केली आहे.

त्यांनी या संदर्भात आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजना ही 2024 मध्ये सुरू झालेली, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातोय.

म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात पात्र लाभार्थ्यांना 18 हजार रुपयांचा लाभ मिळतो. दरम्यान या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ एक जानेवारी 2026 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला.

ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती अशा सर्व लाभार्थ्यांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ मिळाला आहे. खरे तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग केले जाणार असा दावा मध्यंतरी करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात एक जानेवारी रोजी सरकारने लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिला.

यामुळे आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याबाबत पात्र लाभार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आता मंत्री गिरीश महाजन यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी अर्थात 14 जानेवारी 2026 रोजी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा लाभ दिला जाईल अशी माहिती दिली आहे.

नक्कीच या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण, ज्या लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केवायसी प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडून लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

या मुदतीत अनेक लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली मात्र जवळपास 30 लाख लाभार्थ्यांनी केवायसी केली नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे आता या 30 लाख लाभार्थ्यांना पुढील हफ्त्याचे पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे केवायसी प्रक्रियेसाठी शासनाकडून कोणतीच मुदत वाढ पण मिळालेली नाही. यामुळे आता या सर्व केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचा या योजनेतून पत्ता कट होणार हे जवळपास नक्की झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News