Pf Withdrawal : पीएफ अकाउंट असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या कर्मचारी सदस्यांसाठी लवकरच मोठा निर्णय घेतला जाणार आहे.
नव्या निर्णयामुळे आता पीएफचे पैसे काढणे आणखी सोपे होणार आहे. भीम या यूपीआय एप्लीकेशनच्या माध्यमातून आता तात्काळ पीएफ चे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून या निर्णयाचा देशभरातील 30 कोटी हून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ होणार अशी माहिती देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे ही प्रक्रिया लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी या अनुषंगाने आता कामकाज सुरू आहे. यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये भीम ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीएफ अकाउंट धारकांना पैसे काढता येणार असा दावा होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार पीएफ अकाउंट धारकांसाठी ही नवीन सुविधा ईपीएफओ आणि एनपीसीआय यांच्या सहकार्याने उपलब्ध होणार आहे. आरोग्य, शिक्षण तसेच विशिष्ट परिस्थितीमध्ये पीएफ ऍडव्हान्स क्लेम करण्याची सुविधा भीम ॲप्लिकेशन मध्ये उपलब्ध होईल.
दरम्यान क्लेम मध्ये मंजूर होणारी रक्कम थेट UPI ला लिंक असणाऱ्या बँक अकाउंट मध्ये जमा केली जाणार आहे. ही सुविधा एटीएम मधून पैसे काढण्यासारखीच राहणार आहे.
ईपीएफओ च्या डिजिटलायझेशन प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा टप्पा राहणार अशी पण माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सुविधा फक्त भीम या यूपीआय एप्लीकेशन वर उपलब्ध असेल मात्र नंतर इतरही यूपीआय एप्लीकेशन वर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे वृत्त समोर आले आहे.
म्हणजेच भविष्यात ही सुविधा फोन पे, गुगल पे अशा यूपीआय एप्लीकेशन वर पण मिळणार आहे आणि याचा नक्कीच सर्वच पीएफ अकाउंट धारकांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्या प्रणालीच्या माध्यमातून पीएफ सदस्याने PF क्लेम केल्यानंतर EPFO कडून बॅकएंडमध्ये पडताळणी व प्रमाणीकरणचे महत्त्वपूर्ण काम केले जाणार आहे.
मग त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून मंजूर रक्कम तात्काळ संबंधित पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा केली जाईल. पण सुरुवातीच्या टप्प्यात विड्रॉल रकमेवर मर्यादा राहणार आहे. आरबीआय ने यूपीआय व्यवहारांसाठी मर्यादा ठरवलेली आहे आणि याच कारणांमुळे पीएफ रक्कम एकाच वेळी काढण्याची सुविधा या प्रणालीत उपलब्ध राहणार नाही.













