शेअर मार्केट गुंतवणूकदारांना आजपासून खुला होणाऱ्या आयपीओमधून कमाईची सुवर्णसंधी ! 23 रुपयांचा शेअर थेट 35 रुपयांवर जाण्याची शक्यता

Published on -

IPO News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ही अपडेट आयपीओ मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. खरे तर अनेक जण आयपीओ मध्ये गुंतवणूक करू इच्छितात.

दरम्यान जर तुम्हाला ही आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नवीन वर्षातील सर्वात मोठा आयपीओ आज पासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे यामधील शेअरची लॉट साईझ पाहता सर्वसामान्य गुंतवणूकदारांना देखील यामध्ये पैसा लावता येणे शक्य होणार आहे. यामध्ये किमान 13 ते 14 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

हा IPO आज सरकारी कंपनीचा आहे. खरे तर या ipo ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती, कारण की ग्रे मार्केटमध्ये या ipo ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

हा आयपीओ आज पासून अर्थातच नऊ जानेवारी 2026 पासून गुंतवणुकीसाठी खुला झाला असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना पहिल्याच दिवशी 50% पर्यंत रिटर्न मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही ज्या आयपीओ बाबत बोलत आहोत तो आयपीओ आहे कोळसा क्षेत्रातील दिग्गज आणि कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या भारत कोकिंग कोल लिमिटेडचा.

नवीन वर्षातील हा पहिलाच मोठा आयपीओ असल्याने याकडे सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा आहेत. दरम्यान ग्रे मार्केटमधील ट्रेंड पाहता गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी यातून 50 टक्के रुपयांपर्यंत नफा मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. दरम्यान आता आपण या आयपीओ ची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

कसा आहे BCCL चा IPO

आयपीओचा विषय निघाला की गुंतवणूकदार सर्वप्रथम त्याच्या प्राईस बँड बाबत विचारणा करतात. दरम्यान या आयपीओबाबत बोलायचं झालं तर ह्या आयपीओसाठी 21 रुपये ते 23 रुपये प्रति शेअर असा प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे.

तसेच किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओ साठी अर्ज करायचा असल्यास किमान 600 शेअर चा एक लॉट खरेदी करावा लागणार आहे. म्हणजेच एका लॉटमध्ये 600 शेअर्स असतील यानुसार किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉट साठी किमान 13800 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

नक्कीच जे सर्वसामान्य गुंतवणूकदार आहेत ते पण 13 ते 14 हजार रुपयांची गुंतवणूक करून या आयपीओ चा एक लॉट घेऊ शकतात आणि त्यांना कमाईची एक संधी सुद्धा मिळू शकते. दरम्यान हा आयपीओ 13 जानेवारी पर्यंत सबस्क्रीप्शन साठी खुला राहणार आहे.

तसेच याची लिस्टिंग 16 जानेवारी 2026 रोजी होईल अशी शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लिस्टिंग च्या दिवशी हा स्टॉकं 35 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. म्हणजे हा शेअर 34 ते 35 रुपयांना शेअर बाजारात लिस्ट होऊ शकतो असा अंदाज देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News