तुम्हालाही घरकुल मंजूर झाल आहे का ? आता घरबसल्या पाहता येणार गावातील घरकुल लाभार्थ्यांची यादी

Published on -

Pm Awas Yojana : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेने अलीकडेच जपानला ओव्हरटेक करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. लवकरच भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा विश्वास अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे.

मात्र या सगळ्या अभिमानाच्या गोष्टी असल्या तरी प्रत्यक्षात देशात असेही काही लोक आहेत ज्यांना हक्काचे घर सुद्धा नाहीये. मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र आणि निवारा.

मात्र निवाऱ्याविना आजही देशातील लाखो लोक असेच भटकंती जीवन जगत आहेत. दरम्यान अशाच बेघर लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे.

केंद्र पातळीवर केंद्र सरकार आणि राज्य पातळीवर राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना राबवल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातूनही घरकुल योजना राबवली जाते ज्याला पीएम आवास योजना म्हणून ओळखले जात आहे.

पीएम आवास योजना दोन भागात विभागलेली आहे, शहरी भागासाठी वेगळी आणि ग्रामीण भागासाठी वेगळी योजना आहे. दरम्यान याच पीएम आवास योजना ग्रामीण बाबत आज आपण एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.

खरेतर, ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सुरु केली आहे.

या योजनेमुळे अनेकांना आधार मिळाला आहे आणि अनेक बेघर लोक आता स्वतःच्या घरात राहत आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून करोडो कुटुंबांना लाभ मिळाला असून येत्या काळात ही लाभार्थी संख्या आणखी वाढणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही मदत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून दिली जाते. विशेष बाब म्हणजे, लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

त्यामुळे कोणताही मध्यस्थ राहात नाही आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो. घरकुलासाठी मिळणारी रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते. घरकुल मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता, बांधकाम सुरू झाल्यावर दुसरा हप्ता आणि घर पूर्ण झाल्यानंतर तिसरा व अंतिम हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

मात्र, अनेक ग्रामीण भागातील नागरिकांनी अर्ज केलेले असतात पण आपले नाव लाभार्थी यादीत आले आहे की नाही? याची त्यांना माहिती मिळत नाही. त्यामुळे अर्ज केलेले अर्जदार आपले नाव आले आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी सातत्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा तालुका कार्यालयात फेऱ्या मारतात.

परंतु आता ही अडचण दूर झाली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी एक सोपी आणि पारदर्शक ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

घरकुल लाभार्थी यादी घरबसल्या पाहता येणार 

तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे की नाही आता घरबसल्या मोबाईल वरूनच पाहता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी यादी पाहण्यासाठी अर्जदारांनी त्यांच्या मोबाईलवरून किंवा मग लॅपटॉपवरून pmayg.nic.in किंवा pmaymis.gov.in या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यायची आहे.

वेबसाईटवर गेल्यानंतर पहिल्या पानावर म्हणजे Home Page वर ‘AwaasSoft’ या पर्यायावर क्लिक करून ‘Reports’ विभागात जावे. त्यानंतर ‘Social Audit Reports’ आणि पुढे ‘Beneficiary Details for Verification’ या लिंकवर क्लिक करावे.

यानंतर उघडणाऱ्या पानावर राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून योजना वर्ष आणि PMAY-G हा योजना प्रकार निवडावा. कॅप्चा कोड भरल्यानंतर ‘Submit’ किंवा ‘Get Report’ बटणावर क्लिक करताच गावातील संपूर्ण लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसते.

या यादीत लाभार्थ्याचे नाव, घरकुल मंजुरी क्रमांक आणि घराच्या बांधकामाची सद्यस्थिती स्पष्टपणे दिसते. त्यामुळे घरबसल्या आपले नाव यादीत आहे की नाही, हे सहज तपासता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe