एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ नियमात पुन्हा एकदा मोठा बदल, बँकेत जाण्याआधी नक्कीच वाचा

Published on -

SBI News : SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक अर्थात सरकारी बँक. याच देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी आता एक महत्त्वाची अपडेट समोर आल आहे.

आता या बँकेच्या ग्राहकांना एटीएम मधून पैसे काढताना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. एसबीआयने एटीएम व्यवहार शुल्कात वाढ करण्याचा एक नवा निर्णय घेतला असून या निर्णयाचा या बँकेच्या लाखो ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे.

ज्या ग्राहकांना सातत्याने एटीएम मधून पैशांचे व्यवहार करावे लागतात त्यांच्यासाठी ही नक्कीच चिंतेची बातमी राहणार आहे. बँकेच्या या नव्या निर्णयामुळे आता पुढील काळात एटीएम व्यवहार करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

एसबीआयकडून याबाबत एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. बँकेने ही शुल्कवाढ इंटरचेंज शुल्कात वाढ झाल्यामुळे केली आहे. विशेष म्हणजे या आधी सुद्धा बँकेने अशीच वाढ केली होती.

फेब्रुवारी 2025 मध्ये एसबीआयने एटीएम व्यवहार शुल्कात वाढ केली होती. आता नव्या बदलांमुळे ऑटोमेटेड टेलर मशीन (ATM) तसेच ऑटोमेटेड डिपॉझिट-कम-विथड्रॉवल मशीन (ADWM) द्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे शुल्क द्यावे लागणार आहे. 

नव्या निर्णयाचा कोणावर परिणाम होणार?

या निर्णयाचा परिणाम हा मुख्यतः इतर बँकांचे एटीएम वापरणाऱ्या बचत खाते आणि पगार खातेधारकांवर होणार आहे. मात्र, बँकेने स्पष्ट केले आहे की काही विशिष्ट श्रेणीतील खातेधारकांवर या वाढीचा परिणाम होणार नाही.

विशेष म्हणजे, मासिक मोफत एटीएम व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही एसबीआयने सांगितले आहे. एसबीआयच्या बचत खातेधारकांना दरमहा इतर बँकांच्या एटीएममधून पाच मोफत आर्थिक (रोख रक्कम काढणे) तसेच गैर-आर्थिक (बॅलन्स चौकशी, मिनी स्टेटमेंट इ.) व्यवहार करता येणार आहेत.

पण ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आता दोन रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत म्हणजेच 21 ऐवजी 23 रुपये आणि त्यावर जीएसटी आकारले जाणार आहे. तसेच गैर आर्थिक व्यवहारासाठी एक रुपया अतिरिक्त द्यावा लागणार आहे म्हणजेच दहा रुपयांना ऐवजी आता अकरा रुपये द्यावे लागतील आणि त्यावर जीएसटी पण द्यावा लागेल.

महत्त्वाची बाब म्हणजे, स्टेट बँकेने आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांसाठी पूर्वी असलेली अमर्यादित सुविधा रद्द करून मासिक मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा 10 एवढी निश्चित केली आहे.

ही मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक रोख व्यवहारासाठी 23 + जीएसटी आणि प्रत्येक गैर-आर्थिक व्यवहारासाठी 11 + जीएसटी आकारले जाणार आहेत. पण, यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया कडून बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यांवरील सेवा शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तसेच, एसबीआय एटीएममधून एसबीआय डेबिट कार्ड वापरून होणाऱ्या व्यवहारांच्या शुल्कातही बदल झालेला नाही. आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, पुढील सूचना मिळेपर्यंत एसबीआय एटीएममधून कार्डलेस रोख पैसे काढण्याचे व्यवहार पूर्णपणे मोफत आणि अमर्यादित राहणार आहेत.

या निर्णयामुळे एटीएम व्यवहार करताना ग्राहकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली असून, डिजिटल व्यवहारांचा वापर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News