DA Hike : शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहिले आहे.
गेल्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची भेट मिळाली. आठव्या वेतन आयोगाच्या समितीची गेल्या वर्षी स्थापना झाली असून या समितीकडून नव्या आयोगासाठी कामकाज सुरू करण्यात आले आहे.

शिवाय गेल्यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण पाच टक्के महागाई भत्ता वाढ मिळाली होती. पहिल्या सहामाहीत दोन टक्के आणि दुसऱ्या सहामाहीत तीन टक्के अशी एकूण पाच टक्के महागाई भत्ता वाढ गेल्यावर्षी मिळाली.
दरम्यान आता नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढी संदर्भात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर जोवर आठवा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोग अंतर्गत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत राहणार आहे.
जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढणार असा एक अंदाज आता समोर येत आहे. म्हणजेच नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थेट 63 टक्क्यांवर जाणार आहे.
सध्या स्थितीला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळतोय पण जर यावेळी पाच टक्का महागाई भत्ता वाढ मंजूर झाली तर हा महागाई भत्ता 63% होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मोठा दिलासा
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने नोव्हेंबर 2025 साठी AICPI-IW चे निर्देशांक जाहीर केले आहेत. खरे तर जानेवारी 2026 पासून जी महागाई भत्ता वाढ लागू होईल ती महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधी मधील आकडेवारीनुसार ठरणार आहे. आतापर्यंत एआयसीपीआयची नोव्हेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्याचा हा निर्देशांक 148.2 अंकांवर नोंदवला गेला आहे. आता डिसेंबर महिन्यात पण हाच निर्देशांक कायम राहिला तर डीए थेट पाच टक्क्यांनी वाढणार आहे. मात्र याचा अंतिम निर्णय डिसेंबर महिन्याची आकडेवारी समोर आल्यानंतरच होणार आहे.
गेल्यावेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. मागच्यावेळी डीए 55 टक्क्यांवरून 58% झाला होता आणि आता जानेवारी 2026 पासून तो थेट 63 टक्के होणार आहे.
पगारात किती वाढ होणार?
समजा, यावेळी महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढला तर ज्या कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे त्याचा महिन्याचा पगार 900 रुपयांनी वाढणार आहे. अर्थात एका वर्षात सदर कर्मचाऱ्याला दहा हजार आठशे रुपये अतिरिक्त मिळणार आहेत.













