9 महिन्यात चांदीमधून मिळालेत 170% रिटर्न ! आता किती वाढणार भाव ?

Published on -

Silver Price Predictor : मागील वर्ष शेअर मार्केट साठी निराशा जनक राहिले. पण सोने आणि चांदी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी लाभाचे राहिले आहे.

विशेषता चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्यावर्षी चांगला परतावा मिळाला आहे. 90 हजाराची चांदी थेट अडीच लाखांवर गेल्यानंतर आता 2026 मध्ये चांदीचे रेट कसे राहणार हा मोठा सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित होतोय.

खरे तर मागील वर्षी चांदीमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल झालेत. विशेष म्हणजे 2026 हे वर्ष सुद्धा चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी

लाभाचे ठरू शकते असा अहवाल आता समोर आला आहे. प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल कडून चांदीबाबत नवा अहवाल जारी करण्यात आला आहे. 

 2025 मध्ये कसा होता चांदीचा प्रवास 

सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चांदीची किंमत नव्वद हजार रुपये होती. पण डिसेंबरमध्ये किंमत अडीच लाख रुपये किलोपर्यंत पोहोचली.

नऊ महिन्यात चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 170% एवढे जबरदस्त रिटर्न मिळालेत. म्हणूनच चांदीमधील गुंतवणूक गेल्या वर्षी चर्चेत राहिली. आता 2026 च्या पहिल्या सहामाहीत चांदी अशीच तेजीत राहण्याची शक्यता आहे. पण दुसऱ्या सहामाहीत अनेकजण नफा वसुली करतील अशी शक्यता आहे.

यामुळे चांदीची विक्री वाढेल व याचा दबाव म्हणून किमतीत चढ-उतार पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे. मोतीलाल ओसवाल यांनी चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीत चांदीच्या किमतीत तेजी राहणार असा अंदाज दिला आहे.

तसेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत नफा वसुलीमुळे किमतीत चढ-उतार पाहायला मिळणार असे सांगितले आहे. मात्र असे असले तरी करंट मार्केट प्राइस पेक्षा चांदीच्या किमतीत 28 टक्क्यांपर्यंत भरमसाठ वाढ या वर्षात पाहायला मिळणार असा एक अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News