आनंदाची बातमी : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आता वाढीव अनुदान, आता सरकार घर बांधण्यासाठी इतके पैसे देणार

Published on -

Gharkul Anudan Yojana : तुमचेही घरकुलच्या यादीत नाव आले आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. ही बातमी नव्याने घरकुल मंजूर होणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अधिक खास राहणार आहे.

भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तरीही देशात लाखो लोक बेघर आहेत. याच गरजू लोकांसाठी शासन घरकुल योजना राबवते. यामध्ये केंद्राची पीएम आवास योजना एक लोकप्रिय योजना आहे.

ही योजना शहरी व ग्रामीण भागासाठी डिवाइड करण्यात आली आहे. आता या अंतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी हे वर्ष विशेष आनंदाचे राहणार आहे. कारण की सरकारने या योजनेच्या बाबत नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सरकारने पीएम आवास योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या घरकुल अनुदानासोबतच आता सौर ऊर्जेचा अतिरिक्त लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. घरकुल योजनेला प्रधानमंत्री सूर्यघार योजना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील नागरिकांना वीज बिलापासून कायमची मुक्ती मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय. ज्या लोकांना घरकुल मंजूर होईल त्यांच्या घरावर आता शासनाकडून सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे.

या कामासाठी घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त 15000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. घरकुल अनुदानासोबतच आता सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान मिळेल.

कोणाला किती अनुदान?

बीपीएल : 47 हजार 500

सर्वसाधारण : 40 हजार

SC / ST : 45 हजार 

आता घरकुल लाभार्थ्यांना सोलर पॅनलसाठी कमाल पाच हजार रुपये भरावे लागतील. या निर्णयामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना वीज बिलातून कायमची मुक्ती मिळणार आहे.

2024 25 या आर्थिक वर्षात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील 80 हजार घरकुल लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याची पण आकडेवारी समोर आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे फक्त पीएम आवास योजना नाही तर राज्य शासनाकडून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना देखील या अंतर्गत कव्हर होणार आहेत.

माई आवास योजना, यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत मंजूर घरकुलांच्या लाभार्थ्यांना सुद्धा नव्या निर्णयाचा लाभ दिला जाणार आहे. परंतु नव्या निर्णया अंतर्गत सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी जे अनुदान दिले जाणार आहे ते लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार मिळेल.

म्हणजे ज्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ घेऊन त्यांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवायचे असेल त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. ही एक ऐच्छिक स्वरूपाची योजना राहणार आहे. या अंतर्गत एक किलो वॅट क्षमतेचे सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News