Government Employee : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य शासकीय सेवेतील वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या दोन महत्त्वाच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
यामुळे सदर कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईतून दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबत एक महत्त्वाचा जीआर जारी केला होता.

सामान्य प्रशासन विभागाच्या त्या जीआरनुसार राज्यातील ड संवर्गातील म्हणजेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शिलाई दर भत्ता व धुलाई भत्ता दिला जात असतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या भत्त्यांमध्ये कोणतीचं सुधारणा झाली नव्हती आणि यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात मोठी नाराजी होती.
या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून राज्यातील वर्ग 4 म्हणजेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या शिलाई दर भत्ता व धूलाई भत्ता यामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आता आपण या कर्मचाऱ्यांना नव्या निर्णयानुसार किती भत्ता मिळतोय याची माहिती पाहणार आहोत.
शर्ट पॅन्ट शिलाई : आधी वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना या बाबीसाठी दर दोन वर्षांनी अडीचशे रुपये प्रत्येक जोडीप्रमाणे भत्ता मिळत होता. आता 750 रुपये मिळतील.
ब्लाउज शिलाई : आधी या बाबीसाठी दर दोन वर्षांनी 50 रुपये प्रत्येक ब्लाउजसाठी मिळत होते. आता 250 रुपये मिळतील.
लोकरीचा गणवेश शिलाई : या बाबीसाठी आधी चार वर्षातून एकदा 350 रुपये एवढा भत्ता मिळत होता. आता पंधराशे रुपये मिळणार आहेत.
धुलाई भत्ता : आधी प्रत्येक महिन्याला 50 रुपये धूलाई भत्ता दिला जात होता. आता 250 रुपये प्रति महिना मिळणार आहे.













