Ladaki Bahin Yojana : एक जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला.
आता या योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील हफ्त्याची प्रतीक्षा आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्याचा हफ्ता कधी मिळणार हामोठा सवाल उपस्थित होतोय. आता याविषयी एक मोठी डेव्हलपमेंट झाली आहे.

राज्य शासनातील मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी मकर संक्रांतीच्या आधी राज्यातील लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे वितरित केले जाणार अशी माहिती दिली आहे.
राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी या दोन हप्त्यांचे पैसे एकाच वेळी म्हणजेच तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार असे मंत्री महाजन यांनी यावेळी जाहीर केले. राज्यात महापालिका निवडणुकांसाठी सध्या आचारसंहिता सुरू आहे.
अशातच फडणवीस सरकारने मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली असल्याने हा निर्णय आता वादाच्या भौऱ्यात अडकताना दिसतोय.
महायुती शासनाच्या या घोषणे विरोधात काँग्रेस कमालीची आक्रमक झाली आहे. या काळात अशा पद्धतीने निधीचे वितरण करणे म्हणजेच महिलांना प्रलोभन देण्यासारखे आहे, असा आरोप करत काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून रीतसर तक्रार देखील दाखल केली आहे. आता यावर आयोग काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.
दुसरीकडे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर आपले मत व्यक्त करत लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये दिले जातील अशी घोषणा केलीये.
आता राज्यात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मतदान आहे. या काळात अशाप्रकारे पैसे वाटल्याने त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुळे योजनेचे पैसे लांबणीवर पडतील का ? अशी शंका आता पात्र महिलांकडून उपस्थित होत आहे. पण मुख्यमंत्र्यांनी याबाबत महत्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?
काँग्रेस व इतर विरोधक पहिल्या दिवसापासून ह्या योजनेचा विरोध करत आहेत. योजना सुरु केली, तेव्हा ते उच्च न्यायालयात गेले. ही योजना रद्द करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती.
पण, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली होती. आता पुन्हा ते निवडणूक आयोगाला पत्र लिहित आहेत. आता ही आधीच सुरु असलेलली योजना आहे. आधी सुरु असलेली कोणतीही योजना थांबवता येत नाही.
तसेच त्यांनी किती पत्र लिहिले तरी त्यातून त्यांच्या मनातलं विषच बाहेर येईल, पण लाडक्या बहीणीचे पैसे थांबणार नाही, असे सांगत फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना ठरवलेल्या दिवशीच पैसे मिळतील असे स्पष्ट केले आहे.
फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे आता योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 14 जानेवारीच्या आत पैसे मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तरीही हे प्रकरण राज्य निवडणूक आयोगाकडे पोहचल्याने यावर निवडणूक आयोग काय निर्णय देत हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.













