महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ 5 आजाराच्या उपचारासाठी मिळणार दीड लाख रुपयांची मदत

Published on -

7th Pay Commission : सरकारी नोकरी प्रत्येकालाच हवी असते. कारण की, या नोकरीमध्ये सुरक्षितता मोठ्या प्रमाणात असते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पगाराव्यतिरिक्त या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे लाभ शासनाकडून दिले जातात.

दरम्यान, आज आपण महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अशाच एका लाभाची माहिती येथे पाहणार आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना आजारपणात सुद्धा शासनाकडून मदत पोहोचवली जाते.

वास्तविक, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विविध कारणांसाठी अग्रीम रक्कम दिली जाते. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या बाबींसाठी ऍडव्हान्स पैसे मिळतात. वैद्यकीय कारणांसाठी देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अग्रीम म्हणजेच ऍडव्हान्स देण्याची तरतूद आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विविध आजारांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांपर्यंत मदत पुरवली जाते. याबाबत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून 10 फेब्रुवारी 2006 रोजी एक जीआर जारी करण्यात आलेला आहे.

या जीआर नुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच आजारांच्या शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय ऍडव्हान्स मिळतो. आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्या आजाराच्या उपचारासाठी दीड लाखांची मदत मिळते? हे जाणून घेऊयात.

कोणत्या आजारांसाठी मिळते आर्थिक मदत?

सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या जीआरमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हृदय शस्त्रक्रिया, हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया, एन्जिओप्लास्टी, मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया तसेच रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांपर्यंतचा अग्रीम देण्याची तरतूद आहे.

दरम्यान ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत उपचारासाठी दीड लाख रुपयांपर्यंतचा ऍडव्हान्स घ्यायचा असेल त्यांनी या अनुषंगाने आपल्या कार्यालयास वित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्जासोबतच संबंधित कर्मचाऱ्यांना शस्त्रक्रियासाठी लागणाऱ्या खर्चबाबतचे एक अंदाजपत्रक सुद्धा जोडावे लागणार आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शासनमान्य खाजगी रुग्णालयांमध्येच उपचार घ्यावे लागतील. अग्रीमच्या लाभासाठी शासनाने जे दवाखाने निश्चित केले आहेत, तिथेच उपचार घ्यावे लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News