DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. 2025 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए पाच टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. मार्चमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा यात दोन टक्क्यांची वाढ झाली होती. यानंतर ऑक्टोबरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला.
यामुळे आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धरतीवर विविध राज्यांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात आहे.

याच मालिकेत आता छत्तीसगड राज्य सरकारने सुद्धा आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची एक मोठी घोषणा केली आहे. छत्तीसगड राज्य कर्मचारी संघटनेच्या आठव्या अधिवेशनात या संदर्भातील घोषणा करण्यात आली आहे.
छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री विष्णु देव साई यांनी या अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.
आतापर्यंत छत्तीसगड राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% एवढा होता, मात्र यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे म्हणजेच या संबंधित नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 58% वर पोहोचला आहे.
मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी याबाबत आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर सविस्तर माहिती दिली आहे. या निर्णयामुळे आता छत्तीसगड राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या समान महागाई भत्ता मिळणार आहे.
नक्कीच हा निर्णय तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक लाभाचा राहणार असून या निर्णयाचे सगळीकडे स्वागत केले जात आहे.
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांमुळे निर्णय लांबणीवर
राज्यातील सरकारी कर्मचारी सुद्धा डीए वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या राज्यातील कर्मचारी सुद्धा तीन टक्के महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
खरे तर सध्या राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू आहे आणि म्हणूनच त्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यात की मग घेतला जाईल अशी आशा आहे.













