शेअर मार्केट गुंतवणूकदारांची होणार चांदी ! ‘हे’ 3 शेअर्स देतील बंपर रिटर्न

Published on -

Stock To Buy : तुम्ही पण तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही नवीन शेअर्स ॲड करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. खरंतर गुंतवणूकदारांनी योग्य शेअर्स मध्ये गुंतवणूक केली तर त्यांना कमी दिवसात चांगला परतावा मिळू शकतो.

पण जर शेअर्स निवडताना चूक झाली तर गुंतवणूकदारांना प्रचंड नुकसानीचा पण सामना करावा लागतो. यामुळे स्टॉक मार्केट विश्लेषक नेहमीच गुंतवणूकदारांना योग्य अभ्यास करून गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता आहे. मागील वर्षात देखील शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू होते. यावर्षी पण आतापर्यंत अशीच स्थिती पाहायला मिळाली आहे.

यामुळे या स्थितीच्या काळात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या फॅक्टर्सकडे लक्ष द्यावे लागणार आहे. दरम्यान मोतीलाल ओसवाल व मॉर्गन स्टॅनले या ब्रोकरेज हाऊसने मार्केटमधील चढउताराच्या काळात काही शेअर्सची शिफारस केली आहे. आज आपण याच शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. 

 हे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न 

महिंद्रा अँड महिंद्रा : भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर मधील ही दिग्गज कंपनी येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देऊ शकते असा अंदाज आहे. मोतीलाल ओसवालने या शेअर साठी 4521 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.

या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 3724 रुपये आहे. अर्थात करंट मार्केट प्राइस पेक्षा यामध्ये 21 टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज ब्रोकरेज हाऊस कडून देण्यात आला आहे.

एपीएल अपोलो ट्युब्स : मोतीलाल ओसवाल ने या स्टॉक साठी बाय रेटिंग जाहीर केली आहे. अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी 2260 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 1913 रुपये आहे. अर्थात येत्या काळात या शेअर्स मध्ये 18 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. 

लीला पॅलेसेस हॉटेल्स : मॉर्गन स्टॅन्लेने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची करंट मार्केट प्राइस 418 रुपये आहे. पण यासाठी 573 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe