वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत मोठी अपडेट ! 17 जानेवारीला PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा, ‘या’ मार्गांवर धावणार

Published on -

Breaking News : देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वंदे भारत स्लीपर आता लवकरच सुरु होईल असे वृत्त समोर आलंय. 17 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे उद्घाटन करतील.

ही गाडी सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी ही ट्रेन जानेवारी महिन्यात प्रवाशांसाठी सुरू केली जाईल अशी घोषणा केली होती.

पण त्यावेळी याची अधिकृत तारीख जाहीर केली नव्हती. आता रेल्वे मंत्रालयाकडून उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. 17 जानेवारीला या गाडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत. या दिवशी पीएम मोदी वंदे भारत स्लीपर ट्रेनसह 6 अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला देखील हिरवा झेंडा दाखवतील.

आसामला मिळाली मोठी भेट 

पश्चिम बंगालमधील हावडा ते गुवाहाटी या मार्गावर ही गाडी सुरू केली जाणार आहे. यामुळे कोलकत्ता व गुवाहाटी दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

भाडे सर्वसामान्यांना परवडणार  

या प्रीमियम गाडीचे तिकीट दर हे विमान प्रवासापेक्षा कमी राहणार आहे.

थर्ड एसी – 2300 रुपये

सेकंड एसी – दोन हजार रुपये

फर्स्ट AC – 3600

येत्या सहा महिन्यात रेल्वेकडून या प्रकारच्या सहा नव्या ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. तसेच, येत्या 12 महिन्यांच्या काळात ही संख्या 12 पर्यंत नेली जाईल. या ट्रेनमध्ये एकूण 823 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. गाडी 180 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe