सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ बँकेने आणली अनोखी योजना ! तात्काळ मिळणार 35 लाखांचे कर्ज

Published on -

Government Employee News : तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत आहात का? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खास ठरणार आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरविल्या जातात.

पगाराव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना असंख्य आर्थिक लाभ मिळतात. महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता असे अनेक भत्ते सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जातात. यामुळे सरकारी नोकरी नेहमीच तरुणांमध्ये आकर्षणाचा विषय राहते.

सरकारी नोकरीसाठी अनेकजण प्रयत्न करतात. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाने सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एसबीआय एक्सप्रेस क्रेडिट कार्ड योजना राबवली जात आहे.

सदर एक्सप्रेस क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ कर्ज पुरवठा केला जात असून या कर्ज योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी पैशांची उपलब्धता होत आहे.

कशी आहे एक्सप्रेस क्रेडिट कार्ड योजना ?

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. सार्वजनिक क्षेत्रातील हे बँक सरकारी कर्मचाऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून एक विशेष क्रेडिट कार्ड योजना राबवत आहे. या योजनेला एसबीआय एक्सप्रेस क्रेडिट कार्ड योजना असे म्हणतात.

या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना एक विशेष क्रेडिट कार्ड दिले जाते ज्याच्या मदतीने कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या महिन्याच्या पगाराच्या 24 पट किंवा जास्तीत जास्त 35 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

सरकारी कर्मचाऱ्यांनी या क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्जाचा लाभ घेतल्यास त्यांना त्यांच्या सिबिल स्कोरनुसार 10.05% ते 15.05% वार्षिक व्याजदर द्यावे लागते. पण जे कर्मचारी संरक्षण दलात आहेत अशा कर्मचाऱ्यांना फक्त 10.50% वार्षिक व्याजदर लागू होतो.

म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया जवानांना या योजनेच्या माध्यमातून विशेष सवलत या ठिकाणी देते. क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज घेतल्यास सरकारी नोकरदार मंडळीला सहा महिने ते सात वर्ष किंवा मग सेवानिवृत्तीपर्यंतचा कालावधी परतफेडीसाठी दिला जातो.

पण स्टेट बँक ऑफ इंडिया चे हे क्रेडिट कार्ड घ्यायचे असल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार हा मासिक वीस हजार रुपये असणे आवश्यक आहे. सोबतच याचा लाभ फक्त एसबीआय मध्ये अकाउंट असणाऱ्यांनाच मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe