Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर 3 हजार रुपये मिळणार अशी आशा होती. फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना मकर संक्रांतीच्या आधी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये दिले जातील अशी घोषणा पण केली होती.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी तीन-चार दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाडक्या बहिणींच्या खात्यात मकर संक्रांतीच्या आधी दोन महिन्यांचा लाभ दिला जाईल अशी घोषणा केली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याबाबत सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे लाडक्या बहिणी मकर संक्रांतीच्या आधी सरकारकडून 3,000 रुपये मिळणारचं असं समजतं होत्या.
पण राज्यात सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि आदर्श आचारसंहिता सुरू असतानाही फडणवीस सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर 3000 रुपयांचा लाभ जमा करत असल्याची चर्चा समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाने यावर आक्षेप घेत थेट राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.
ऍडव्हान्स पैसे मिळणार नाहीत
आदर्श आचारसंहिता सुरू असताना अशा प्रकारचा लाभ वितरित करणे म्हणजेच मतदारांना प्रलोभन देण्यासारखे आहे असा आरोप त्यांनी केला. यावर राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ ॲक्शन घेतली आणि राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत.
दरम्यान मुख्य सचिवांकडून राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर आता महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार लाडक्या बहिणींना योजनेचा अग्रिम लाभ देता येणार नाहीये.
म्हणजेच लाडक्या बहिणींना जो जानेवारीचा हप्ता मिळणार होता तो हप्ता मिळणार नाहीये. राज्य निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ह्या योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास मनाई केली आहे.
म्हणजे आता जानेवारी महिन्याचा लाभ देता येणार नाही. मात्र असे असले तरी नियमित किंवा प्रलंबित हफ्ता देता येईल असेही निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले आहे.













