गुंतवणूकदारांना 5 शेअर्स मोफत मिळणार ! ‘ही’ कंपनी देणार Bonus Share ; रेकॉर्ड तारीख नोट करा

Published on -

Bonus Share : बोनस शेअर्स अन लाभांश देणाऱ्या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असते. दरम्यान तुम्ही पण बोनस शेअर्स देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

मार्केटमधील एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना पाच मोफत शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या संबंधित कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आहेत. च्या स्थितीत आज आपण या बोनस शेअर्सच्या वाटपाची डिटेल माहिती आलेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोण देणार पाच मोफत शेअर्स 

मिळालेल्या माहितीनुसार Jonjua Overseas Ltd ही कंपनी आपल्या शेअर होल्डर्स ला पाच मोफत शेअर्स देणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आता या प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

कारण की यासाठीची रेकॉर्ड तारीख याच महिन्यात आहे. 5:40 च्या प्रमाणात कंपनीकडून बोनस शेअर्स जारी करण्याचा निर्णय झाला आहे. अर्थात ज्या गुंतवणूकदारांकडे रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचे 40 शेअर्स असतील त्यांना अतिरिक्त पाच शेअर्स मोफत दिले जाणार आहेत.

यातील प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपये इतके असेल. बोनस इशू नंतर बाजारात एकूण 30 लाख 30 हजार 844 नवीन इक्विटी शेअर्स येणार आहेत. दरम्यान या बोनस इशू साठी कंपनी आपल्या राखीव निधीतील पैशांचा वापर करणार आहे.

यासाठी कंपनीत तीन कोटी तीन लाख 8 हजार 440 रुपयांचा वापर करणार आहे. दरम्यान या बोनस इशू साठी 23 जानेवारी 2026 ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान पात्र ठरणाऱ्या गुंतवणूकदारांना 27 जानेवारी पासून बोनस शेअर चे वाटप होईल अशी माहिती देण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी हा स्टॉक मार्केटमध्ये सात रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत होता.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe