मुंबईवरून या शहरासाठी सुरू होणार नवीन लोकल ट्रेन! खासदार श्रीकांत शिंदे यांची घोषणा

Published on -

Mumbai News : राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व्यस्त आहेत. ठाण्यात सुद्धा तशीच स्थिती आहे. इथे सर्वच पक्षांनी आपला पूर्ण जोर लावला आहे.

खा. श्रीकांत शिंदे यांनीही आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा सुरू केल्या आहेत. रविवारी त्यांची दिव्यात सभा होती. यावेळी त्यांनी मुंबईहून भविष्यात आणखी एक लोकल ट्रेन सुरू होणार असा दावा केला.

प्रवाशांना मिळणार दिलासा 

दिवा – CSMT विशेष लोकल सेवा सुरू होणार अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच बुलेट ट्रेनचे स्थानक दिव्यातील माथर्डी परिसरात उभारले जात असल्याने दिवा शहराचे महत्त्व आणखी वाढणार आहे. इथं भविष्यात कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा थांबतील.

अंबरनाथ सारख्या प्रकल्पांची गरज 

दिवा शहरात मोठ्या गृहसंकुलांचा झपाट्याने विस्तार होत आहे.वाढती लोकसंख्या लक्षात घेता दर्जेदार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. अंबरनाथ येथे मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदाहरण देत, भविष्यात दिवा शहरातही अशा प्रकल्पांची उभारणी केली जाईल, असा दावा त्यांनी केला.

युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने कल्याण रोड परिसरात टाटा स्किल सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील सहा ते सात महिन्यांत ते सुरू होणार आहे. तसेच भविष्यात दिवा शहरात उद्योजक घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचाही मानस असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe