SBI चा मोठा निर्णय ! 15 फेब्रुवारीपासून नेट बँकिंग आणि एप्लीकेशनमधून पैसे पाठवणे होणार महाग, इतके शुल्क लागणार

Published on -

SBI News : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  हा निर्णय मात्र सर्वसामान्य ग्राहकांसाठी चिंतेचा ठरतोय. खरे तर अलीकडेच बँकेने एटीएम व्यवहार शुल्कात वाढ केली होती.

आता बँकेने इमिजिएट पेमेंट सर्विस द्वारे पैसे पाठवण्यासाठी पण शुल्क वसुल करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर आधी फक्त बँकेतून इमिजिट पेमेंट सर्विस द्वारे पैसे पाठवले तर बँकेकडून शुल्क वसूल केले जात होते

मात्र आता डिजिटल पद्धतीने इमिजिट पेमेंट सर्विसचा अर्थात IMPS चा वापर करून पैसे पाठवले तरीसुद्धा शुल्क द्यावे लागणार आहे. दरम्यान बँकेच्या या निर्णयाचा लाखो ग्राहकांवर परिणाम होणार अशी माहिती दिली जात आहे.

खरंतर अलीकडे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र असे असतानाच आता डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना एसबीआय कडून दणका मिळाला आहे.

त्यामुळे सध्या बँकेच्या या नव्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून आज आपण बँकेच्या नव्या निर्णयानंतर नेट बँकिंग करणाऱ्यांना तसेच अँप्लिकेशनच्या माध्यमातून पैसे पाठवणार यांना किती भुर्दंड बसणार याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती भुर्दंड बसणार

मर्यादा     शुल्क 

25 हजारपर्यंत – शुल्क नाही 

25 हजार ते 1 लाख – 2 रुपये + GST

1 लाख ते 2 लाख – 6 रुपये + GST

2 लाख ते 5 लाख – 10 रुपये + GST

नव्या निर्णयाची अंमलबजावणी कधी

एसबीआयने लागू केलेले हे नवीन शुल्क मोबाईल ॲप आणि इंटरनेट बँकिंग द्वारे केलेल्या आय एम पी एस व्यवहारांसाठीच लागू राहणार आहे. ग्राहकांनी बँकेच्या शाखेत जाऊन आय एम पी एस द्वारे पैसे पाठवले तर त्यांना आधीच्या नियमानुसार पैसे भरावे लागणार आहेत.

एसबीआय ने डिजिटल सेवांची देखभाल आणि संचालन खर्चाचे कारण देऊन ही शुल्क वाढ केलेली आहे. दरम्यान एसबीआयचा हा नवा निर्णय पुढील महिन्याच्या पंधरा तारखेपासून प्रत्यक्षात अमलात आणला जाणार आहे. अर्थात 15 फेब्रुवारी 2026 पासून मोबाईल एप्लीकेशन आणि नेट बँकिंग द्वारे पैसे पाठवणे सर्वसामान्यांसाठी महागडे ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe