ब्रेकिंग : 14 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ‘या’ सर्व शाळांना सुट्टी मंजूर !

Published on -

Breaking News : आज राज्यात सगळीकडे भोगी सण साजरा होतोय. तर उद्या मकर संक्रांतीच्या महत्त्वाचा संसारा होणार आहे. गुजरात मध्ये उत्तरायण म्हणून हा सण साजरा होणार आहे. दरम्यान या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे.

उद्या मकर संक्रांति निमित्ताने काही शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. उद्या सार्वजनिक सुट्टी नाहीये. पण स्थानिक पातळीवर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आपण नेमक्या कोणत्या शाळा बंद राहणार याची माहिती पाहूयात. 

कोणत्या शाळा बंद राहणार ?

1)जिल्हा परिषद सांगली अंतर्गत येणाऱ्या सर्व कन्नड व मराठी शाळेला उद्या सुट्टी देण्यात आली आहे. याबाबत एक परिपत्रक निर्गमित झाले आहे. 

2)जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांनी 12 जानेवारी रोजी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. 

3)महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांना पण अनौपचारिक रित्या सुट्टी मिळणार आहे. कारण की शाळांमध्ये मतदान केंद्र राहणार असून शिक्षक देखील निवडणूक कामकाजासाठी जाणार आहेत. 

4)आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वच आश्रमशाळांना मकर संक्रांतीच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe