Lucky Rashi : हे नवं वर्ष ग्रहांच्या महत्त्वपूर्ण हालचालींमुळे काही लोकांसाठी फायद्याचे राहणार आहे. जानेवारी महिन्यात काही प्रमुख ग्रह राशी बदल करणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य मानवी जीवनावर दिसून येणार आहे.
येत्या दोन दिवसांनी महालक्ष्मी राजयोग तयार होईल. यामुळे येणारा काळ आर्थिक, व्यावसायिक आणि करिअरच्या दृष्टीने निर्णायक ठरणार अशी चर्चा आहे.

16 जानेवारीला पराक्रम, ऊर्जा आणि धाडसाचा कारक ग्रह मंगळ मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत चंद्रही याच राशीत गोचर करणार आहे. या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग तयार होतोय. हा योग धनवृद्धी, आर्थिक स्थैर्य, नव्या संधी घेऊन येणार आहे.
या लोकांना मिळणार जबरदस्त लाभ
मकर : हा काळ अत्यंत अनुकूल मानला जात आहे. मंगळ आणि चंद्र दोन्ही मकर राशीत सक्रिय असल्यामुळे करिअरमध्ये स्थैर्य, मेहनतीची दखल आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यावसायिकांना नवे करार किंवा भागीदारीतून लाभ होऊ शकतो. सामाजिक प्रतिष्ठाही वाढण्याची शक्यता आहे.
कन्या : या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग भाग्यवर्धक ठरू शकतो. कामानिमित्त देश-विदेश प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. व्यवसायात अडचणींचा सामना करणाऱ्यांना नव्या संधी मिळू शकतात. अध्यात्मिक व धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढण्याचीही शक्यता आहे.
कर्क : या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक दिलासा देणारा ठरू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. घरगुती वातावरण सकारात्मक राहील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.













