मकर संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता पण मिळणार नाही का ? निवडणूक आयोगाचे आदेश सांगतात….

Published on -

Ladki Bahin Yojana : 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू आहे. मात्र तरीही मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या आधी दोन महिन्यांचे पैसे मिळणार अशी माहिती दिली होती.

यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा असेच संकेत दिले होते. मात्र आदर्श आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारचा निधी वितरित करणे म्हणजे मतदारांना प्रलोभित करण्यासारखे आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

या अनुषंगाने काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र सुद्धा पाठवले. दरम्यान प्रकरणाची गांभीर्यता पाहता राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ राज्याच्या मुख्य सचिवाला वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत.

यानुसार मुख्य सचिवांनी लाडकी बहीण योजनेच्या त्यांच्या निधी वितरणाबाबत सरकारची भूमिका आणि वस्तुस्थिती स्पष्ट केली. दरम्यान आता राज्य निवडणूक आयोगाने लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निकाल दिला आहे.

आयोगाचा निकाल काय सांगतो ?

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजनेअंतर्गत आगाऊ हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.

म्हणजेच जानेवारीचा हप्ता देण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई करण्यात आली आहे. सोबतच नवीन लाभार्थी निवडण्याची सुद्धा मनाई करण्यात आली आहे.

पण डिसेंबर महिन्याची रक्कम देण्यासाठी परवानगी मिळाली आहे. यामुळे आता फडणवीस सरकार काय निर्णय घेत हे पाहाव लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News