3 वर्षात 529% रिटर्न देणाऱ्या शेअर्समध्ये सलग 8 दिवस झाली मोठी घसरण ! आता पुन्हा रॉकेट तेजीत संकेत, कारण काय?

Published on -

Share Market News : मागील काही दिवस सातत्याने घसरण झाल्यानंतर शेअर मार्केट मधील एक स्टॉक आता पुन्हा रॉकेट तेजीत येण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

खरंतर हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने गेल्या तीन वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न देण्याची किमया साधली आहे.

पण मागील काही महिने या शेअर्स साठी आव्हानाचे राहिलेत आणि सातत्याने याच्या किमती कमी होत होत्या. मात्र आज मंगळवार 13 जानेवारी 2026 रोजी सलग आठ दिवसांच्या घसरणीनंतर या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली आहे.

संकटाचा काळ संपला 

बाळू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सने आज 13 % रिटर्न दिलेत. यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. कंपनीला भारतीय आयकर विभागाकडून दिलासा मिळाल्यानंतर याच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

खरे तर या कंपनीची आयकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. कंपनीच्या काही कार्यालयांमध्ये आणि उत्पादन युनिट्स मध्ये आयकर कायदा 1961 अंतर्गत आयकर विभागाने चौकशी केली आणि ही चौकशी काल समाप्त झाली.

या चौकशीच्या कारणास्तव गेल्या आठ दिवसांपासून कंपनीचे शेअर्स सातत्याने घसरत होते. 7 जानेवारीला एकरी विभागाची चौकशी सुरू झाली होती आणि काल म्हणजे 12 जानेवारीला ही चौकशी संपली.

दरम्यान याबाबत कंपनीने म्हटले आहे की त्यांनी आयकर तपासात पूर्णपणे सहकार्य केले असून या तपासात कोणताच गैरप्रकार आढळलेला नाही. आयकर तपासात कोणतीच त्रुटी आढळली नसल्याने आता पुन्हा एकदा या कंपनीचे शेअर्स रॉकेट तेजीत येण्याचे संकेत निर्माण होत आहेत.

कंपनीची शेअर मार्केट मधील कामगिरी 

मागील बारा महिन्यांच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 23 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांना यातून 70% रिटर्न मिळाले आहेत. तसेच मागील तीन वर्षांमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना 529% इतके जबरदस्त रिटर्न दिले आहेत.

सध्या हा शेअर 499 च्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. आज सकाळी या कंपनीचा स्टॉक 455 रुपयांच्या रेंजमध्ये ओपन झाला आणि काही तासातच याच्या किमतीत 13 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe