325% रिटर्न देणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा मोठी वाढ ! शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लागली लॉटरी

Published on -

Multibagger Stock : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. Industrial Finance Corporation of India Limited या सरकारी कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा रॉकेट तेजीत आले आहेत.

खरे तर मागील तीन वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्क्याहून अधिक रिटन दिले आहेत. आता मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा हा स्टॉक तेजीत आला आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांना बंपर लाभ मिळतोय.

आज मंगळवारी या शेअर्स मध्ये जवळपास सहा टक्क्यांची वाढ झाली असून सध्या या कंपनीचे स्टॉक 59 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. मागील दोन दिवसांच्या काळात या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 21% एवढे जबरदस्त रिटर्न मिळाले आहेत.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर मिळून सुमारे 12 कोटी शेअरची उलाढाल झाली असल्याची माहिती पण समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर स्टॉक एक्सचेंजने कंपनीला पत्र लिहून याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे.

या कारवाईचा गुंतवणूकदारांवर कोणताच परिणाम होणार नाही कारण की ही कारवाई गुंतवणूकदारांच्या हितासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी करण्यात आली आहे. आता आपण मागील काही वर्षांमधील या शेअरची कामगिरी कशी राहिली आहे याचा आढावा येथे घेणार आहोत.

 शेअर मार्केट मधील कामगिरी

 कंपनीला सप्टेंबर तिमाहीमध्ये चांगला नफा मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या तिमाही मध्ये कंपनीचा नफा 73 टक्क्यांनी वाढला आहे. विशेष बाब म्हणजे कंपनीच्या महसूल मध्ये किरकोळ घट झालेली असतानाही कंपनीचा नफा वाढलेला आहे.

यावरून कंपनीचे कार्यक्षमता गेल्या काही महिन्यांमध्ये चांगली सुधारली असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे. ही भारत सरकारची एक वित्तीय संस्था आहे. ही कंपनी औद्योगिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रांना आर्थिक मदत पुरवण्याचे काम करत आहे.

दरम्यान मागील तीन वर्ष कंपनीच्या वाढीसाठी चांगले राहिलेत. मागील बारा महिन्यांच्या काळात यात गुंतवणूक करणाऱ्यांना 13 टक्के इतके रिटर्न मिळाले आहेत.

तर गेल्या तीन वर्षांच्या काळात यात गुंतवणूक करणाऱ्यांना 325 टक्के एवढे जबरदस्त रिटर्न मिळाले आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून हा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत आला असल्याने याकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe