Home Loan : तुम्ही पण तुमच्या स्वप्नातील घरासाठी गृह कर्ज घेण्याच्या विचारात आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.
खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआय ने रेपो रेटमध्ये प्रचंड कपात केली आहे आणि या कपातीचा फायदा कर्जदारांना मिळतोय.

मागील वर्षात आरबीआयने रेपो रेटमध्ये 1.25 टक्क्यांपर्यंत कपात केली. या निर्णयाचा फायदा म्हणून होम लोनसहित सर्वच प्रकारचे कर्जांचे व्याजदर कमी झालेत.
अशा स्थितीत आज आपण देशातील अशा काही बँकांची माहिती पाहणार आहोत ज्या की आपल्या ग्राहकांना सर्वात कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहेत.
सर्वसामान्यांना द्यावे लागणार कमी व्याज
Bank Of India : गेल्या काही दिवसांपासून बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचे मर्जर होणार अशा चर्चा सुरू आहेत. हीच चर्चेत असणारी बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सर्वात कमी व्याजदरात होम लोन देत आहे. ही बँक 7.10% ते 10% व्याजदरात कर्ज देते. मोठ्या कर्जासाठी म्हणजेच 75 लाख रुपयांच्या कर्जासाठी व्याजदर 10.25% पर्यंत जातो.
Bank Of Maharashtra : या यादीत बँक ऑफ महाराष्ट्र चा सुद्धा समावेश होतो. या बँकेकडून ग्राहकांना 7.10 ते 9.90% व्याजदराने होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक : ही पण सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे जे आपल्या ग्राहकांना 7.10% दराने होम लोन पुरवते.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया : ही बँक आपल्या ग्राहकांना 7.10% ते 9.15% या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
युको बँक : या यादीतील आणखी एक सरकारी बँक म्हणजे युको. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 7.10% ते 9.25% व्याजदरात गृह कर्ज दिले जात आहे.













